Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव; तर भाजप नेत्यांचे...

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव; तर भाजप नेत्यांचे नांदेडमधील कार्यक्रम रद्द

Subscribe

मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? असा जाब विचारत आंदोलनकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना घेराव घातला. जिल्ह्यातील धर्माबाद शहरात हा प्रकार घडला. या प्रकारानंतर आता भाजप नेत्यांनी आपले नांदेडमधील कार्यक्रम रद्द केले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून ठिकठिकाणी उपोषणे- आंदोलन केलं जात आहे. त्यातच आता लोकप्रतिनिधींना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाजाच्या या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? असा जाब विचारत आंदोलनकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना घेराव घातला. जिल्ह्यातील धर्माबाद शहरात हा प्रकार घडला. या प्रकारानंतर आता भाजप नेत्यांनी आपले नांदेडमधील कार्यक्रम रद्द केले आहेत. (The issue of Maratha reservation flared up Ashok Chavan surrounded by Maratha protesters The program of BJP leaders in Nanded was cancelled )

भाजप नेत्यांचा दौरा रद्द

प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना घेराव घालत आहेत. मराठा समाजाच्या या आक्रमक भूमिकेची राजकीय नेत्यांनी देखील धास्ती घेतली होती. शनिवारी काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांना घेराव घातल्याची घटना घडल्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. तसंच, नांदेड आणि लातूरच्या भाजप खासदारांनी देखील रात्रीतून उद्घाटन कार्यक्रम रद्द केले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात सकल मराठा समाजाचे उपोषण सुरू आहे. मागील पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण केलं जात आहे. त्यातच शनिवारी काँग्रेसच्यावतीनं महेश्वरी भवन येथे पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी आंदोलनकर्ते डोक्याला काळ्या फिती लावून बैठक स्थळी पोहोचले.

(हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -