घरमहाराष्ट्ररायगडातील सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रायगडातील सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Subscribe

५९१ बंदरांपैकी २० बंदरे संवेदनशील, निगराणीसाठी सीसीटीव्हीचा अभाव

नौदलाने ३ वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ५९१ बंदरांपैकी रायगड जिल्ह्यातील २० बंदरे संवेदनशील असल्याचा अहवाल दिला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बंदरे महत्त्वाची असताना येथे सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आहे. रेवदंडा व परिसरातील बंदरे आधुनिक काळात सुरक्षा साधनांअभावी दिवसेंदिवस संवेदनशील होत आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. सीसीटीव्हीअभावी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा, थेरोंडा, आग्राव, मुरूड तालुक्यातील बोर्ली, तारा बंदर असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील अन्य किनार्‍यांवरही असल्याचे दिसून येते. त्यामुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्याच्या २४० किमीच्या किनारपट्टी, कुंडलिका, सावित्री, अंबा नद्यांच्या पात्रातही अनेक नैसर्गिक बंदरे आहेत. मालाची चढ-उतार सहज करणे शक्य असलेली ही बंदरे नागरी वस्तीपासून दूर असल्याने बंदरांचा वापर देशविघातक कारवायांसाठी होण्याची भीती अधिक आहे. पावसाळ्यात तर ही सुरक्षा पूर्णपणे वार्‍यावर असते. पोलीस, नौदलाच्या नौकांद्वारे होणारी सागरी गस्त पूर्णपणे बंद असते. याच दरम्यान मासेमारीही बंद असते. त्यामुळे खोल समुद्रात घडणार्‍या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सुरक्षा यंत्रणांना कठीण होते. बंदर परिसर, जेटीवर सीसीटीव्ही नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. श्रीवर्धनमधील शेखाडी येथे उतरलेले आरडीएक्स हे त्यापैकीच एक उदाहरण. दहशतवादी कारवायांबरोबरच डिझेल चोरी, रेती उत्खनन, अमली पदार्थांची तस्करी आदींसाठीही मुख्य शहरापासून दूर असलेल्या बंदरांचा उपयोग होत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

रायगड जिल्ह्याच्या २४० किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीवर अनेक नैसर्गिक बंदरे आहेत. कुंडलिका, सावित्री, अंबा नद्यांच्या पात्रांत ही नैसर्गिक बंदरे आहेत. मालाची चढ-उतार सहज करणे शक्य असलेली ही बंदरे नागरी वस्तीपासून दूर असल्याने या बंदरांचा वापर देशविघातक कारवायांसाठी होऊ शकतो, असा इशारा सुरक्षा यंत्रणांचा आहे. यापूर्वीही या बंदरांचा उपयोग स्मगलिंग, स्फोटके उतरविणे यासाठी केला गेला आहे. १९९३चा साखळी बॉम्बस्फोट आणि २६/११च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर येथील सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तरीही अपुरे मनुष्यबळ, सुरक्षा साधनांची कमतरता यामुळे नौदलाने यातील २० बंदरे संवेदनशील असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानंतर जुजबी सुधारणा केल्या आहेत. मान्सूनमध्ये येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते.

पावसाळ्यात तर सुरक्षा पूर्णपणे वार्‍यावर असते. पोलीस पहारा, नौदलाची नौकांद्वारे होणारी सागरी गस्त पूर्णपणे बंद असते. यादरम्यान मासेमारीही बंद असते. त्यामुळे खोल समुद्रात घडणार्‍या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सुरक्षा यंत्रणांना कठीण असते. सागरी सुरक्षेसाठी अनेक विभाग कार्यरत आहेत. त्यात पोलीस, नौदल, मत्स्य व्यवसाय, बंदर विभाग आणि मच्छीमार यांचा प्रमुख सहभाग आहे. या सर्वांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे, तरच काही संशयास्पद हालचाली वेळेत टिपता येणे शक्य आहे. बंदरातील नागरिकांनाही सागरी सुरक्षेबद्दल सूचना दिल्या जातात.

- Advertisement -

पोलीस प्रशासनातील ३ बोटी नादुरुस्त
रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षा करण्यासाठी रायगड पोलीस विभागाकडे शासनाने ९ स्पीड बोटी दिल्या होत्या. कृष्णा, वशिष्ठी, गोदावरी, खंदेरी, कुलाबा, कुंडलिका, सावित्री, रायगड २, रायगड ४ या ९ बोटी असून त्यापैकी कृष्णा, वशिष्ठी, गोदावरी या ३ बोटी नादुरुस्त असल्याने बंद अवस्थेत आहेत. बंद बोटींबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक व संचालक दळणवळण आणि परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयास सादर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील सागर सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.

बोटींची देखभाल दुरुस्ती, तरीही गस्त सुरूच
पावसाळ्यात बोटीच्या सुरक्षेसाठी सध्या आपत्कालीन काळात बोटीचे नुकसान होऊ नये व मान्सून कालावधी संपल्यानंतर कोस्टल सुरक्षेसाठी वापरण्यात यावी यादृष्टीने बोटी पाण्याबाहेर घेऊन त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत आहे. समुद्र किनार्‍यावर गस्त ही पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे आणि लँडिंग पॉईंट येथे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -