वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून मविआत फूट पडू शकते, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

इतिहासात काय घडलं, हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा अशा मताचे आम्ही आहोत, राहुल गांधींनी याकडे लक्ष द्यावं, असं संजय राऊत म्हणाले. 

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) गेल्या बारा दिवसांपासून महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रा शेगावच्या दिशेने रवाना झाली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ही यात्रा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकर (Veer Savarkar Conflict) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. वीर सावरकर यांच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत फूट (Split in Mahavikas Aghadi) पडू शकते, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी दिला आहे.

हेही वाचा गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी शेगावात घेणार जाहीर सभा, मनसेकडून निषेध

‘राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपल्या देशात तक्रारी दाखलं करणं, तक्रारीच्या आधारावर प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्देश झालाय. वीर सावरकरांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. काल शिवसेना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, वीर सवारकरांची बदनामी, चुकीचं वक्तव्य मान्य करणार नाही. सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. देशात हुकुमशाहीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुलामाच्या बेड्या ठोकणारं हे सरकार आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवर अत्याराचाविरोधात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आहे. असं असताना वीर सावरकर यांचा मुद्दा काढण्याची गरज नव्हती. यामुळे फक्त शिवसेनेलाच नाहीतर संगळ्यांना धक्का बसला आहे. इतिहासात काय घडलं, हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा अशा मताचे आम्ही आहोत, राहुल गांधींनी याकडे लक्ष द्यावं, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे असा आरोप राहुल गांधी यांनी मंगळवारच्या भाषणात केला होता. त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र, राहुल गांधी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकारंनी इंग्रजांना लिहेलेले पत्र सादर केले. या पत्रात सावरकरांनी तुमचा नोकर होऊन राहू इच्छितो अशी मागणी केली होती, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. सावरकरांच्या मुद्द्यांवरून शिवसेना काँग्रेसवर नाराज असल्याचं समोर आलं आहे. तसंच, सावरकरांविरोधातील कोणतीही वक्तव्य आम्ही मान्य करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं होतं. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला होता. तेच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकरता आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीबाबत स्पष्ट केलं होतं. दरम्यान, आज राहुल गांधी शेगावात आहेत. त्यांच्या यात्रेला निषेध करण्यासाठी मनसैनिक तेथे पोहोचले आहेत. तसंच, भाजपाकडूनही विविध पद्धतीने राहुल गांधी यांचा निषेध केला जातोय. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा भारत जोडो यात्रा : शेगावच्या सभेत मनसेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर.., युवा काँग्रेसचा इशारा