घरमहाराष्ट्रपरतीच्या पावसाचा प्रवास सुरू; राज्यातील 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला यलो अलर्ट

परतीच्या पावसाचा प्रवास सुरू; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला यलो अलर्ट

Subscribe

मुंबई : आज राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली. ठाणे, रायगडसह रत्नागिरीला हवामन विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यासह देशात परतीचा पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यात मुंबई, मुंबई उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळतील. ठाणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि रायगडला देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार यांचे मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणासंदर्भात मोठे विधान, म्हणाले… 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून पवासाने परतीचा प्रवास सुरू आहे. देशातील उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक ठिकाणी परतीच्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी हवामान हळूहळू कोरडे होत आहे. यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज वर्तवली जात आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्र तयार होत आहेत. यामुळे आठवड्याच्या शेवटी पश्चिम बंगाल आणि ओडिशासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -