घरताज्या घडामोडीअपहरणकर्ता सांगतोय ‘याकरिता’ केले चिमुकलीचे अपहरण

अपहरणकर्ता सांगतोय ‘याकरिता’ केले चिमुकलीचे अपहरण

Subscribe

मुलीचा मृत्यु झाल्याने आपल्याला कुणाचा तरी आधार मिळावा याकरीता बालिकेला उचलून नेल्याची कबुली अपहरणकर्त्याने पोलिसांना दिली आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालयातून अपहरण झालेल्या बालिकेला सीबीएस परिसरातील जिल्हा न्यायालय समोरून ताब्यात घेण्यात आले.

माणिक सुरेश काळे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा फुलेनगर शनी मंदिर येथे राहणारा असून त्याने दोन दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालयातून दिड वर्षाच्या बालिकेचे अपहरण केले होते. या घटनेनंतर मुलीला गमावलेल्या आईने अन्नपाणी सोडले होते. तीन दिवस उलटूनही अपहरण झालेल्या या चिमुकलीचा शोध न लागल्याने ही माता रडून रडून बेहाल झाली. सरकारवाडा पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत संशयिताचा शोध सुरू केला अखेर ही बालिका आज पोलिसांना मिळून आली. त्यानंतर काही तासांतच अपहरणकर्त्यालाही पकडण्यात पोलिसांना यश आले. माणिक काळे असे या संशयिताचे नाव असून काही दिवसांपूर्वी माणिक काळेच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृत्यू झाल्यामुळे माणिक काळेवर दुखाचा डोंगर कोसळला होता. नैराश्याने घेरलेल्या माणिक ला आपल्याला आता आधार कुणीच नाही, अशी भावना निर्माण झाली होती. आपल्याला कुणी तरी आधार मिळावे म्हणून माणिकने बालिकेला उचलून नेल्याचे सांगितले.

- Advertisement -

असा उघड झाला प्रकार
बाळाचे अपहरण केल्यानंतर त्याने बाळाला फुलेनगर येथील घरी देखील 2 दिवस ठेवले असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, सोमवारी रात्रीपासून त्या चिमुरडीला खोकला येत असल्याने मंगळवारी सकाळी संशयित माणिक काळे हा तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पायी चालत घेऊन जात होता. त्याचवेळी ड्युटीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने सुरेश काळेला सीबीएसजवळ ताब्यात घेतली. त्याची अधिक चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -