छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस आणि आता अजित पवारांच्या सरकारच्या काळात पहिल्यांदाच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधे उद्या (16 सप्टेंबर) मंत्रिमंडळाची बैठक होऊ घातली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री, 250 सचिव, उपसचिव आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या सर्वांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल, विश्रामगृहाच्या बुकींगसह 300 च्य वर गाड्यांचेही बुकींग करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला आहे. याचपाश्वभूमीवर आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना सरकारवर हल्लाबोल केला आहे. (The king is eating peasants and peasants Vijay Wadettivar attacked the state government from the cabinet meeting)
हेही वाचा – विखे पाटलांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने धनगर समाज संतप्त; राज्य सरकाराचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, शेतकरी उपाशी असताना राजा मात्र तुपाशी खातोय. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी पाहिजे होती. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला 1500 रुपयांची थाळी. सरकारची दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की, महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय त्यांनी कोणासाठी किती रूम बुक केल्या आहेत? याचा तपशील देखील दिला आहे.
राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी.
सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी.
विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी…
दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,… pic.twitter.com/NMQZ0TdB12
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 15, 2023
फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री) ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव) अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी) Ajanta Ambassador 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी) महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक) पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक) वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 (इतर अधिकारी) एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा – निवडणुका जवळ आल्या की जातीय दंगली घडवल्या जातात; विश्वजीत कदमांचा सरकारवर गंभीर आरोप
मंत्रिमंडळ बैठकीतून शेतकऱ्यांसाठी घोषणा होणार?
दरम्यान यंदा राज्यात उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने ऑगस्टमध्ये चांगलीच पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी चिंतित आहे. यामध्ये मराठवाड्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. या भागात सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांपुढील संकटे आणखी गडद झाले आहेत. आता याच मराठवाड्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होऊ घातली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या बैठकीतून काय-काय घोषणा केल्या जातात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.