घरमनोरंजनहास्य जगताचा बादशहा हरपला! प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांकडून शोक

हास्य जगताचा बादशहा हरपला! प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांकडून शोक

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. गिरगाव येथील राहत्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यात मराठी नाट्यक्षेत्रात त्यांनी आपला वेगळाच दबदबा निर्माण केला. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. मात्र प्रदीप पटवर्धन यांच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहलंय की, “मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.”

- Advertisement -

मोरूची मावशी नाटकामुळे मिळाली प्रसिद्धी
मोरूची मावशी हे त्यांचे प्रचंड गाजलेले नाटक. या नाटकामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. एक विनोदी अभिनेते म्हणून प्रदीप पटवर्धन यांना ओळखले जायचे. विनोदाचे टायमिंग व हजरजबाबीपणा यामुळे त्यांनी रसिकांवर आपली वेगळी छाप निर्माण केली होती. मराठीतील मालिका आणि चित्रपटातही वेगवेगळ्या धाटणीच्या उत्तम भूमिका साकारल्या. त्यासोबतच अनेक दर्जेदार नाटकातही त्यांनी अभिनय केला.


हेही वाचा :ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -