घरताज्या घडामोडीकायदा हातात घेतल्यास खपवून घेणार नाही; राष्ट्रवादीच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचा इशारा

कायदा हातात घेतल्यास खपवून घेणार नाही; राष्ट्रवादीच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचा इशारा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जाळपोळ करत आंदोलन केले आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जाळपोळ करत आंदोलन केले आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. ‘लोकशाहीनुसार आंदोलन करणे योग्य आहे. पण कायदा हातात घेणे हे खपवून घेतले जाणार नाही’, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. (The law will not be tolerated if taken in hand CM Eknath Shinde warning on NCP agitation)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परळच्या शिरोडकर हायस्कूल शाळेत हजेरी लावली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांशी गप्पांचा तास झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “आमचे सरकार कुठल्याही परिस्थितीत राजकीय सूडबुद्धीने कारवाई करणार नाही. हे कायद्याचे राज्य आहे, नियमानुसार सरकार चालते. लोकशाहीनुसार आंदोलन करणे योग्य आहे. पण कायदा हातात घेणे हे खपवून घेतले जाणार नाही”, असे म्हटले.

- Advertisement -

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याबाबतच्या वक्तव्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. “जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही, याची माहिती नाही. पण ज्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याची पोलीस नियमानुसार चौकशी करतील”, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गर्दीत धक्का लागल्याचे कारण देत भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

हेही वाचा – व्हिडीओमध्ये विनयभंग कुठेच दिसत नाही, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; अजित पवारांचे सरकारवर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -