घरमहाराष्ट्रपुणे विद्यापीठ रॅप साँग प्रकरण: "शासनस्तरावर दखल घ्यावी", अजित पवारांची राज्यपालांकडे पत्राद्वारे...

पुणे विद्यापीठ रॅप साँग प्रकरण: “शासनस्तरावर दखल घ्यावी”, अजित पवारांची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

Subscribe

मुंबई | पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या (Savitribai Phule University) प्रतिमेला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील अधिसभा भरण्याच्या ठिकाणी अश्लिल भाषेतील रॅप साँगचे ( Rap Song) चित्रीकरण करण्यात आले आहे. या रॅप साँगचे चित्रीकरण विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलवर दारूची बाटल आणि शस्त्र ठेवून करण्यात आले आहे. या प्रकारची शासनस्तरावर दखल घेण्यात यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्राद्वारे केली आहे.

विद्यापीठातील कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून त्या समोरच्या टेबलवर दारूची बाटली ठेवण्यात आली होती. आणि याच टेबलवर शस्त्र ठेऊन शुभम जाधव या गायकाने रॅप साँगचे चित्रीकरण केले आहे. आणि हे रॅप साँग सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहे. या प्रकरणी विद्यापीठासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची विद्यापीठाने चौकशी करण्यासाठी समिती नियुक्ती केली आहे. या प्रकरामुळे शैक्षणिक क्षेत्रात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलीस तपास आणि चौकशी समितीच्या अहवालातून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, असे अजित पवारांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. तसेच कोणत्याही विद्यापीठात भविष्यात अथवा शैक्षणिक संकुलात असा प्रकार घडणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना द्याव्यात असेही अजित पवारांनी म्हणाले.

- Advertisement -

कारवाई झाली पाहिजे – वरुण सरदेसाई   

या रॅप साँगमध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि यात वापरलेले हत्यारे हे विद्यापीठाच्या परिसरात वापरणे हा संपूर्ण प्रकार अत्यंत भयंकर असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी म्हटले. “आम्ही पदाधिकारी आणि बाकी कार्यकर्ते विद्यापीठाच्या परिसरात येतो. तेव्हा सगळ्यांची सुरक्षारक्षकांकडून चौकशी केली जाते. आणि कमी पदाधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जातो, असे असून सुद्धा येथे अश्लील भाषा वापरलेले रॅप साँगची शुटींग झाली. यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका वरुण सरदेसाई घेतली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -