घरमहाराष्ट्रजॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा परवाना रद्दच, मुंबई हायकोर्टाकडूनही शिक्कामोर्तब

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा परवाना रद्दच, मुंबई हायकोर्टाकडूनही शिक्कामोर्तब

Subscribe

या उत्पादनातील PH हा प्रमाणित मानकांनुसार नाही. ही पावडर वापरल्याने नवजात तसंच लहान मुलांच्या त्वचेला अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावडरचे उत्पादन सुरू ठेवणं हे योग्य होणार नाही, असं अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे.

मुंबई – जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) या कंपनीवर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Department Of Maharashtra) मोठी कारवाई केली होती. एफडीएने कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता. मुंबई उच्च न्यायालायनेही परवाना रद्दचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर कंपनीवर एफडीएची मोठी कारवाई, उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द

- Advertisement -

नवजात बालकांसाठी जॉन्सन अॅंड जॉन्सन बेबी पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत दोष असल्यामुळं नवजात शिशू आणि लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. कंपनीचे उत्पादन अशाच प्रकारे सुरू राहिल्यास बालकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे मुंबई आणि मुलुंडमध्ये असणाऱ्या संस्थेच्या उत्पादनाचा परवाना आजच्या आदेशान्वये कायम स्वरूपी रद्द करण्यात आला होता. हे प्रकरण नंतर मुंबई उच्च न्यायलयात गेले. कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका मांडली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला दिलासा न देता एफडीएचा निर्णय कायम ठेवला.

गेल्या अनेक वर्षांपासून जॉन्सन अॅंड जॉन्सन कंपनी भारतात आपल्या उत्पादनांची विक्री करत आहे. परंतु सदर नमुने सदोष आहेत. त्यामुळेच या कंपनीच्या उत्पादनचा परवाना रद्द करण्यात येत आहे असं सरकारच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या उत्पादनातील PH हा प्रमाणित मानकांनुसार नाही. ही पावडर वापरल्याने नवजात तसंच लहान मुलांच्या त्वचेला अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावडरचे उत्पादन सुरू ठेवणं हे योग्य होणार नाही, असं अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -