घरक्राइमपोलीस बदल्यांची यादी अनिल परबांकडून येत होती, देशमुखांच्या जबाबावर आता परबांचं स्पष्टीकरण

पोलीस बदल्यांची यादी अनिल परबांकडून येत होती, देशमुखांच्या जबाबावर आता परबांचं स्पष्टीकरण

Subscribe

पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे, असा जबाब अनिल देशमुखांनी दिला आहे. विशेष म्हणजे तो चार्जशीटमध्येही नोंदवण्यात आलाय. मला इतर कोणीही नव्हे, तर खुद्द अनिल परब यांनी यादी दिली होती. तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली असल्याचं जबाबात अनिल देशमुख म्हणाले होते.

मुंबईः अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी अनिल परब आपल्याकडे देत होते, असा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुखांनी दिलाय. त्यावरच आता अनिल परबांनी खुलासा केलाय. याबाबत कुठलीही माहिती आमच्याकडे नाही, हे नेमकं प्रकरण तपासून बघावं लागेल, अशी सावध प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलीय. अनिल परबांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे, असा जबाब अनिल देशमुखांनी दिलाय. विशेष म्हणजे तो चार्जशीटमध्येही नोंदवण्यात आलाय. मला इतर कोणीही नव्हे, तर खुद्द अनिल परब यांनी यादी दिली होती. तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली असल्याचं जबाबात अनिल देशमुख म्हणाले होते. तसेच सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा दबाव होता, असा परमबीर सिंह यांनी दावा केला होता, परंतु तो दावा अनिल देशमुखांनी फेटाळून लावलाय.

- Advertisement -

ईडीने केलेल्या चौकशीत अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांचे आरोप फेटाळून लावलेत. देशमुख यांनी याउलट परमबीर सिंग हे अँटेलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेनच्या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटलेय. परमबीर सिंह यांनी कोणत्याही प्रश्नांची थेट उत्तरे दिली नाहीत, असेही त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते. परमबीर सिंह नेहमी गोंधळात टाकणारी उत्तरे देत होते. पण देशमुख यांनी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंग रॅकेटबाबत आपल्यावरील आरोपांचा चेंडू अनिल परबांकडे टोलवला होता. अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी अनिल परब देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

बदली-पोस्टिंग प्रकरणातही परमबीर सिंह यांचा मोठा खुलासा

दुसरीकडे परमबीर सिंह यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यांना वारंवार सरकारी गेस्ट हाऊस ‘सह्याद्री’मध्ये बोलावलं जात होतं. तेथे अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगची यादी देण्यात येत होती. 2020 मध्ये मुंबईच्या डीसीपीच्या बदलीचे आदेश दिले होते. तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तो आदेश मागे घेण्यास सांगितले होते. सीताराम कुंटे यांनी आपल्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच आदेश असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. यानंतर आपण आदेश मागे घेतल्याचे परमबीर सिंह यांनी आपल्या खुलाशात म्हटले. सोबतच तो व्हॉट्सअॅप मेसेज अजूनही त्यांच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

- Advertisement -

अनिल देशमुख यांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन करत कामे करून घेतली, असे परमबीर सिंह यांनी सांगितले. कधी ते थेट सूचना द्यायचे तर कधी सीताराम कुंटे यांच्यामार्फत करून घ्यायचे. प्रशांत कदम यांची डीसीपी झोन ​​7 मध्ये नियुक्तीसुद्धा अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून झाली होती. अनिल देशमुख यांच्यामुळे पोलीस आस्थापना मंडळाच्या नियमांचे अनेकदा उल्लंघन झाले होते.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगमध्ये परबांचा हात, माझा नाही – देशमुख

परंतु पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याच्या आरोपांना उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खापर फोडलं. अनिल परब पोलीस अधिकाऱ्यांची यादी घेऊन त्यांच्याकडे यायचे. त्या यादीत शिवसेनेच्या आमदारांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावे असायची. त्यांची बदली आणि पोस्टिंगसाठी ते शिफारस करायचे. त्या यादीवर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती, असंही देशमुख यांनी ईडीने केलेल्या चौकशीत सांगितले.


हेही वाचाः Santosh Parab Attack Case: नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -