घरमहाराष्ट्रCoronaVirus: लॉकडाऊनमुळे गणेशमूर्तीकारांचीही वाढली चिंता

CoronaVirus: लॉकडाऊनमुळे गणेशमूर्तीकारांचीही वाढली चिंता

Subscribe

जेमतेम साडे तीन महिने हातात असताना बाप्पाची पीओपीची मूर्ती साकारायची की पर्यावरणपूरक असा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे.

राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन असून, आता लॉकडाऊन पुन्हा 17 मे पर्यत वाढवण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या रोजगाराची चिंता असताना आता बाप्पाची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांची देखील चिंता वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे जेमतेम साडे तीन महिने हातात असताना बाप्पाची पीओपीची मूर्ती साकारायची की पर्यावरणपूरक असा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे.

यामुळे मूर्तीकार संभ्रमात 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी १० वर्षांपूर्वीची एक याचिका निकाली काढली. या याचिकेवर सुनावणी करताना गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या देवी-देवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर महाराष्ट्र राज्य सरकारने कायमस्वरूपी बंदी घालावी. अशा मूर्ती तयार तयार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार राज्य सरकारने कोणताच ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे पीओपीच्या मूर्ती की पर्यावरणपूरक शाडू माती आणि कागदी लगद्याच्या मूर्ती साकारायच्या या संभ्रमात सर्व मूर्तीकार आहेत.

कृपया आमची रोजगारबंदी करुन आमच्यावर उपासमारीची वेळ न आणता महाराष्ट्र राज्य शासनाने आमच्या या पारंपारिक व्यवसायाकडे अत्यंत गांभीर्याने जातीपूर्वक लक्ष्य द्यावे ही विनंती.

– श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना ( महाराष्ट्र राज्य )

- Advertisement -

कोरोनामुळेही वाढली चिंता 

राज्यात लॉकडाऊन असल्याने गणेशमूर्ती घडवायला कलाकार आणि कामगारांना घराबाहेर पडून कार्यशाळेत ये-जा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कलम १४४ शिथील होईल का ? तसेच लागणारी माती, रंग, हत्यारे इत्यादी साहित्य सामग्री घेण्यासाठी दुकाने उघडली जातील का? याची देखील चिंता या मुर्तीकारांना लागली आहे. दरम्यान गणेश मूर्तिकार कामगार संघटनेने राज्य सरकारला पत्र लिहिले असून, सध्या प्रत्येक मूर्तिकार आणि कामगार यांच्या मनात धडकी भरली आहे, त्याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या कार्यशाळेत आम्ही असंख्य पीओपीच्या मूर्ती बनवून ठेवल्या आहेत तसेच या व्यवसायासाठी अनेकानेक अर्ज देखील काढलेले आहेत याचमुळे राज्य सरकारने यावर्षीच्या गणेशोत्सवात तसेच नवरात्री पर्यंत पीओपीच्या मूर्ती विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे पुढील वर्षी लहान मूर्ती या फक्त शाडू मातीच्या पर्यावरण पूरक आम्ही तयार करू असे, देखील या पत्रात म्हटले आहे.


अमेरिकेतली ३०० कुटुंबांची महाराष्ट्राला साथ; व्हेंटिलेटर्स, धान्याची मदत!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -