घरमहाराष्ट्रअनिल परबांच्या अडचणी वाढणार? परिवहन खात्यातील पदोन्नतीमधील कथीत भ्रष्टाचाराची चौकशी होणार

अनिल परबांच्या अडचणी वाढणार? परिवहन खात्यातील पदोन्नतीमधील कथीत भ्रष्टाचाराची चौकशी होणार

Subscribe

राज्यपालांच्या आदेशानंतर लोकायुक्त चौकशी करण्यात येणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीसाठी लाखो रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानंतर लोकायुक्तांकडून चौकशी केली जाणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी राज्यातील परिवहन विभागातंर्गत कार्यरत अधिकारी बजरंग खरमाटे, वर्ध्यातील परिवहन विभाचे उप प्रादेशिक अधिकारी यांनी अनिल परब यांच्या संगनमताने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना, प्रतिनियुक्ती, पदोन्नती प्रकरणी लाखो रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी चार महिन्यांपूर्वी या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. २ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता सुनावणी होणार आहे. आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे सचिन वाझे आहे. त्याच्या मार्फत २५ लाखांपासून १ कोटींपर्यंतची वसुली केली जात होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -

बजरंग खरमाटे यांच्या घरावर ईडीचा छापा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने सोमवारी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर छापा टाकला. बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब मंत्री असलेल्या आरटीओ विभागात कार्यरत आहेत. खरमाटे यांच्यावर आरटीओ विभागातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Anil Deshmukh Case : अनिल परबांच्या खात्याशी संबंधित आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -