Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम प्रियकराने भररस्त्यात केला विनयभंग अन्..

प्रियकराने भररस्त्यात केला विनयभंग अन्..

Related Story

- Advertisement -

प्रेयसीचे लग्न ठरल्याचे समजताच प्रियकराने तिचा भरस्त्यात विनयभंग करत नियोजित वराला प्रेमसंबंधाची माहिती दिल्याची धक्कादायक घटना ११ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजता बारदाण फाटा, गंगापूर रोड, नाशिक येथे घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित अजिज सईद शेख (रा.वडाळा, नाशिक) यास अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी व संशयित अजिज शेख एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओळखीतून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. कालांतराने दोघांमध्ये काहीएक संबंध आले नाहीत. पीडित तरुणी कामावर जाण्यासाठी एकटी ११ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजता गंगापूर रोडवरील बारदाण फाटा येथे रिक्षाची वाट उभी राहिली होती. त्यावेळी संशयित अजिज शेख दुचाकी घेऊन तिच्याजवळ आला. त्यानंतर त्याने तिचा भररस्त्यात विनयभंग केला. तिचे लग्न ठरले असल्याचे समजताच त्याने तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती नियोजित वराला दिली. वधुच्या प्रेमसंबंधाची माहिती समजताच नियोजित वराला धक्काच बसला. त्याने तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. त्यातून तिचे जमलेले लग्न मोडले. पुढील तपास पोलीस हवालदार पठाण करत आहेत.

- Advertisement -