Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मराठा समाजाचा OBCमध्ये समावेश करण्यासाठी सकल मराठा समाजाचे १ मेपासून ठिय्या आंदोलन

मराठा समाजाचा OBCमध्ये समावेश करण्यासाठी सकल मराठा समाजाचे १ मेपासून ठिय्या आंदोलन

Subscribe

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. यानंतर आता राज्य सरकार पुन्हा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी सकल मराठा समाजाची जिजामाता कन्या विद्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाज पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक झाल्याचे दिसले. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी १ मेपासून छत्रपती संभाजीनगरतील (Chhatrapati Sambhajinagar) क्रांती चौकात मराठा समाज ठिय्या आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा – मान्सूनच्या आधी ठाणे वाहतूक कोंडीमुक्त करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना

- Advertisement -

मराठा समाजाला मिळालेले एसईबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालाने मे २०२०मध्ये रद्द केले. यासंदर्भात दोन वेळा मराठा आरक्षणासाठी पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, दोन्ही वेळा पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शनिवारी झालेल्या बैठकीत एसईबीसी आरक्षण मान्य केले नसते, तर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाला असता. मराठा समाजाचे आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयात नव्हे तर, राजकीय इच्छा शक्तीवर अवलंबून असल्याचे सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी या बैठकीत सांगितले.

मराठा आरक्षणासाठी १ मेपासून आंदोलन

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी १ मेपासून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. “कोणीही राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये. राज्य सरकारने येथेच चर्चेला यावे. जे मुंबई चर्चेला जातील, त्यांनी येथे येऊ नये. सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल”, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

“आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवला अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय पूजा करू देणार नाही”, असा इशारा मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्यावतीने पंढरपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला होता.

- Advertisment -