Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र गौतमी पाटीलच्या आडनावाला विरोध नाही म्हणत मराठा महासंघाने ठेवली 'ही' अट

गौतमी पाटीलच्या आडनावाला विरोध नाही म्हणत मराठा महासंघाने ठेवली ‘ही’ अट

Subscribe

जालना : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील आणि तिच्याशी संबंधित वाद आता हे काही नवीन राहिले नाही. नुकत्याच पाटील आडनावावरून सुरू झालेल्या वादात राजकीय नेत्यांनी उडी घ्यायला सुरूवात केली आहे. या प्रकरणी आता मराठा महासंघानेही प्रतिक्रिया देताना गौतमी पाटीलच्या आडनावाला विरोध नाही म्हणत अट ठेवली आहे. (The Maratha Federation kept ‘this’ condition by saying that there is no objection to Gautami Patil’s surname)

मराठा महासंघाच्या नेत्या अनुराधा ठाकरे यांनी स्पष्ट आणि परखड मत मांडताना वक्तव्य केले की, पाटील हे आडनाव कुणाचीही मक्तेदारी नाही. गौतमीच्या पाटील आडनावाला आमचा विरोध नाही, फक्त तिने अश्लील हावभाव करू नये. जेणेकरून युवा पिढीला त्रास होणार नाही. असे म्हणत त्यांनी गौतमीच्या पाटील आडनावाला समर्थन देखील दिले आहे.

- Advertisement -

पाटील आडनावावरून गौतमी पाटीलची प्रतिक्रिया
मी ‘पाटील’ आहे, पाटीलच लावणार आहे, अशी कणखर भूमिका घेत मी तुमच्या पुरुषी अहंकारापुढे झुकणार नाही, असं गौतमीने अप्रत्यक्ष सांगितलं आहे.

संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया
संभाजीराजे छत्रपतींनी पाटील आडनावावरून सुरू असलेल्या वादावर जळगाव असताना प्रतिक्रिया देताना म्हटले की, महिलांनी आपले गुण व कर्तृत्व दाखवायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोकसुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. त्यामुळे कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

शाहीर संभाजी भगत यांची

शाहीर संभाजी भगत यांची फेसबुक पोस्ट

नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते?? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण ….
ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे …नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये !!!

आजपर्यंत ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे!!

पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही , मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही ?? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत??

मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे, भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच, पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्रीकडेसुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात !! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्यापेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात!! बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात!!

स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धा याबाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !!

 

- Advertisment -