सोशल मीडियावर कांद्याच्या दरवाढीचे मेसेज, प्रत्यक्षात लाभ कुणाला ?

सटाणा : कांद्यांचे माहेरघर समजल्या जाणार्‍या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी आहेत शेतकरी सध्या सर्वत्र कांदा काढणीस सुरुवात केली आहे कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी उत्पन्न घेतलेला कांदा साठवणूक करून ठेवतो व काही माल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहे मात्र कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून भाव वाढण्याची प्रतीक्षा पण असते मात्र अडचणी असल्यामुळे काही प्रमाणात कांदा काढल्यावर कांदा विक्रीसाठी बाजार समितीमध्ये घेऊन जावा लागतं आहे.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव ह्या बाजार समितीने दिला त्या बाजार समितीने दिला अशी बेकिंग न्यूज इलेक्ट्रिक मिडीया तसेच सोशल मीडियावर मेसेज बाजार समिती मार्फत दिला जातो त्यामुळे शेतकरी कांद्याला सर्वाधिक बाजारभाव कोणत्या बाजार समितीने दिला हे बघून आपला कांद्याचा माल त्या बाजार समिती पर्यंत घेऊन जातो मात्र त्या ठिकाणी कांद्याला कमी भाव मिळाल्यावर शेतकरी निराश होत असतो याला कारणीभूत संबंधित बाजार समिती असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

 

“नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीने सोशल मीडियावर शेतकर्‍यांचा ग्रुप केला आहे त्या ग्रुप वर रोज बाजार समिती कांद्याचे भाव मात्र बाजार समिती कांद्याला हा भाव दिला मात्र किती ट्रॅक्टर व वाहनांना दिला कधीच टाकत नाही बाजार समितीने किती ट्रॅक्टर व किती वाहनांना कांद्याला भाव दिल्याच जर टाकलं तर शेतकर्‍यांची दिशाभूल होणार नाही तरी यापुढे बाजार समितीने जसे कांदाभाव किती ट्रॅक्टर व वाहनांना कांदा भाव दिला यासंदर्भात सोशल मीडिया माहिती देत जावी : मिथुन सोनवणे, कांदा उत्पादक शेतकरी निकवेल”