अल्पवयीन कार चालकाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले; २ जणांचा जागीच मृत्यू

एका अल्पवयीन कार चालकाने दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना जागीच चिरडल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. शनिवार २ जुलै रोजी डहाणू बोर्डी राज्यमार्गावर ही घटना घडली.

एका अल्पवयीन कार चालकाने दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना जागीच चिरडल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. शनिवार २ जुलै रोजी डहाणू बोर्डी राज्यमार्गावर ही घटना घडली. राज्य मार्गावरून बोर्डी कडून पारनाका डहाणू कडे येणाऱ्या भरधाव वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने सदरचा अपघात झाला असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. (The minor car driver crushed the cleaning staff 2 died on the spot)

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात डहाणू नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी भरत कानजी राऊत (55) आणि वंकेश मंजी झोप (38) यांचा मृत्यू झाला आहे. कानजी राऊत हे आगर, कॉटेज हॉस्पिटल जवळ राहणारे रहिवाशी आहेत. तसेच, वंकेश मंजी झोप चिंबावे बामनपाडा येथे राहणारे रहिवाशी आहेत. हे दोघेही डहाणू-बोर्डी राज्यमार्गावर रस्त्याच्या पूर्वेकडे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वच्छतेचे काम करत होते.

वाहन चालक हा अल्पवयीन मुलगा असून तो भरधाव वेगात कार चालवत होता दरम्यान डहाणू उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर वाहनावरील ताबा सुटून समोरील दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडून कार भिंतीला जाऊन धडकल्याची माहिती मिळाली आहे. अपघात प्रकरणी डहाणू पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान पाऊस आल्याने ते जवळच असलेल्या भिंतीच्या आडोश्याला उभे होते. ते उभे असताना बोर्डी बाजूकडून पारनाका बाजूला येणाऱ्या एका भरधाव कार क्रं. MH 48 AC 8771 चालकाचा ताबा सुटून कारने त्यांना चिरडले आहे. अपघातात दोनही स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून १६ वर्षीय अल्पवयीन कार चालक इराणीरोड येथे राहणार रहिवाशी आहे.

प्रत्यक्ष दर्शिंनी डहाणू पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी दोनही कर्मचाऱ्यांचे मृतदेह डहाणू उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. प्रत्यक्ष दर्शिंकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रुग्णालय व पोलीस स्टेशनच्या आवारात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. डहाणू पोलिसांकडून अल्पवयीन मुलावर नेमकी कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ह्याची माहिती मिळू शकली नाही.


हेही वाचा – निवृत्तीनंतर मिताली राजला पत्राद्वारे पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा