घरताज्या घडामोडीदगडं मारलेत पण गोळ्या मारल्या तरी गप्प बसणार नाही, गाडीवरील हल्ल्यांनंतर पडळकर...

दगडं मारलेत पण गोळ्या मारल्या तरी गप्प बसणार नाही, गाडीवरील हल्ल्यांनंतर पडळकर यांची प्रतिक्रिया

Subscribe

गोळ्या मारल्या तरी गप्प बसणार नाही

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सोलापुरात पडळकर गाडीतून जात असताना काही अज्ञात आले आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आहे. या हल्ल्यात पडळकरांना कोणतीही इजा झाली नसून त्यांची तब्येत उत्तम आहे. परंतु या हल्ल्यांतर पडळकरांनी प्रतिक्रिया देताना प्रस्थापितांवर हल्लाबोल केला आहे. विचारांची लढाई विचारांनी लढायाल पाहिजे. परंतु दगडफेक केली आहे उद्या जरी गोळ्या घातल्या तरी भूमिका मांडण्यापासून थांबणार नाही असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. पडळकर मागील काही दिवसापासून राज्यातील नागरिकांचे प्रश्न मांडत असल्यामुळे बरेच चर्चेत आहेत.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक करण्यात आली. यावर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे याबाबत राज्याला माहित आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभर गोरगरीबांच्या बाजूने बोलत आहे. त्यांची बाजू मांडत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात जाहीरपणे बाजू मांडल्यामुळे त्यांना आवडले नसेल. ते जे सगळे गप्पा मारतात लोकशाहीचे, फुले-शाहू आंबेडकरांचे त्यांच हेच उत्तर आहे का? अशा पद्धतीने उत्तर द्यायचे आहे का? वैचारिक लढाई आहे तर विचाराने चाला असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

गोळ्या मारल्या तरी गप्प बसणार नाही

पडळकर यांनी पुढे म्हटलं आहे की, अनेक विषयांवर भाष्य करत आहे परंतु ते त्या विषयांवर बोलत नाही. अशा पद्धतीने जर उत्तर देणार असतील तर निश्चितपणे गप्प बसणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी गप्प बसणार नाही माझी भूमिका मांडत राहणार अशी रोखठोक भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे.

हल्ला करुन पळाले

गोपीचंद यांनी प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, घोंगडी बैठकीसाठी ५०० लोकं जमले होते. ही बैठक संपल्यानंतर काही अंतरावर पुढे गेलो त्यानंतर गाडीवर हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या वेळी पाहिले तर ४ ते ५ लोक होते. अंधार असल्यामुळे आणखी किती लोकं होती याबाबत कल्पना नाही असे पडळकर यांनी म्हटलं आहे. घटनास्थळी पोलीसांचे पथक पोहोचले असून पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -