घरCORONA UPDATEकेरळच्या किनारपट्टीवर मान्सून पाच जूनला धडकणार; वेधशाळेने वर्तवला अंदाज

केरळच्या किनारपट्टीवर मान्सून पाच जूनला धडकणार; वेधशाळेने वर्तवला अंदाज

Subscribe

यंदा नैऋत्य मान्सूनला सुरुवात पाच जूनपासून होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचे संकट कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. यंदा नैऋत्य मान्सूनला सुरुवात पाच जूनपासून होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाच जून या दिवशी केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. यावर्षी केरळच्या किनारपट्टीवर येण्यास नैऋत्य मान्सूनला मागील वर्षीच्या तुलनेत थोडा विलंब झाला आहे. यावेळी तो पाच जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षापासून मॉन्सूनच्या आगमन कालावधीमध्ये बदल झाला आहे. यामध्ये एक आठवड्याचे अंतर निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दक्षिण बंगालचा उपसागर दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होण्यास ही स्थिती निर्माण होणार आहे. साधारण दीर्घकालीन वेळेनुसार मान्सून २० मे पर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होऊन बहुतांशी भाग व्यापतो. गेल्यावर्षी १८ मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर संपूर्ण अंदमान बेट व्यापण्यास ३० मे पर्यंत वाट पाहावी लागली होती. तसेच यावर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा शंभर टक्के पाऊस पडण्याचा अंदाज विभागाने यापूर्वी जाहीर केला आहे. यात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -