घरमहाराष्ट्रअखेर उड्डाण: बहुप्रतीक्षित कोल्हापूर - मुंबई विमान सेवेला आजपासून सुरुवात

अखेर उड्डाण: बहुप्रतीक्षित कोल्हापूर – मुंबई विमान सेवेला आजपासून सुरुवात

Subscribe

या विमान प्रवास सेवेमुळे मुंबई - कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होय आहे. त्याचबरोबर वेळेची सुद्धा बचत होणार आहे. मुंबई विमानतळावरून विमान सकाळी 10.30 वाजता उड्डाण करणार आणि कोल्हापुर मध्ये सकाळी 11.20 वाजता पोहोचणार आहे.

बहुप्रतीक्षित कोल्हापूर – मुंबई विमानसेवेला आजपासून प्रारंभ होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपथितीत लावणार आहेत. संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून ही विमान सेवा सुरू केली जात आहे. दरम्यान मुंबई – कोल्हापूर – मुंबई ही विमानसेवा (Kolhapur – Mumbai flight service begins today) आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आठवड्यातून तीन दिवस ही विमान सेवा असणार आहे.

हे ही वाचा – ‘मी दोन्ही मेळाव्यांची भाषणं ऐकणार नाही’ म्हणत फडणवीसांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला

- Advertisement -

कोल्हापुरे ते मुंबई तिकिटांचे दर 2 हजार 573 रुपये एवढे असणार आहेत. या विमान प्रवास सेवेमुळे मुंबई – कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होय आहे. त्याचबरोबर वेळेची सुद्धा बचत होणार आहे. मुंबई विमानतळावरून विमान सकाळी 10.30 वाजता उड्डाण करणार आणि कोल्हापुर मध्ये सकाळी 11.20 वाजता पोहोचणार आहे. केवळ 40 मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. तर कोल्हापुहून सकाळी 11.50 वाजता विमान उड्डाण करून मुंबईत दुपारी 12.45 वाजता पोहचणार आहे. कोल्हापूर – मुंबई मार्गावर विमानसेवा सुरु व्हावी अशी मागणी प्रवासी मागील अनेक दिवसांपासून करते होते.

हे ही वाचा – ‘5 जी’ आले, पण अर्थकारण बिघडले; शिवसेनेचे ‘सामना’तून मोदी सरकारवर शरसंधान

- Advertisement -

दरम्यान कोल्हापूर मुंबई विमानसेवा ही कोरोना काळात बंद करण्यात आली होती. कोल्हापूर मुंबई विमानसेवेला प्रवाश्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता. पण कंपनीने अचानकच ही विमान सेवा बंद केली. त्यानंतर सेवा सुरू व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी करत होते. अखेर प्रवाशांच्या मागणीला यश आले. कोल्हापूर सोबतच सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमधील प्रवाशांनासुद्धा ही विमान सेवा सोईस्कर ठरणार आहे. सध्या कोल्हापूर मधून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेची सुद्धा बचत होणार आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -