घरक्राइममद्यपार्टीतून बेपत्ता युवकाचा खूनच; शवविच्छेदनात बाब उघड

मद्यपार्टीतून बेपत्ता युवकाचा खूनच; शवविच्छेदनात बाब उघड

Subscribe

नाशिक : गोदापार्क परिसरात मद्यपार्टीदरम्यान बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेहाचे डॉक्टरांनी गुरुवारी (दि.१७) सकाळी शवविच्छेदन केले असता त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. बेपत्ता तरुणाच्या चौकशीदरम्यान एका मित्राने आत्महत्या केल्याने पोलिसांना तरुणाचा खून झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे. दीपक गोपीनाथ दिवे (वय २७, रा.भोईरवाडी, चांडक सर्कलजवळ, तिडके कॉलनी, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक दिवे हा प्लंबिगचे काम करतो. तो तिडको कॉलनीत पत्नी, सासरे व भाऊसोबत राहतो. त्याला बुधवारी (दि.९) मित्र विजय जाधव याने पार्टीसाठी बोलवले होते. त्यानुसार दीपक व त्याचा मित्र आशिष आंबेकर हे दोघे बुधवारी (दि.९) दुपारी 4.15 वाजता आशिषच्या रिक्षाने गोदापार्क, सहदेवनगर (डीकेनगर)मध्ये दारुच्या पार्टीसाठी गेले. सायंकाळी 6.30 वाजता विजय जाधव, पवन पोटींदे, लाला भामरे हे तिघे दीपकच्या घरी आले. तिघांनी दीपकच्या पत्नीस विचारले की, दीपक घरी आला आहे का. त्यावेळी तिने तो तुमच्यासोबत होता. त्यानंतर तिघे तिला म्हणाले की, पार्टीवेळी दीपकला कॉल आल्याने तो घरी जातो, असे सांगून गेला. नंतर त्याचा मोबाईल स्वीचऑफ झाला. त्यामुळे तिघेजण दीपकच्या घरी आले. त्यानुसार दीपालाने दीपकच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र, दीपकचा मोबाईल स्वीचऑफ आला. याप्रकरणी दीपाली दीपक दिवे हिने गुरुवारी (दि.१०) गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेंव्हापासून गंगापूर दीपकचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

मद्यपार्टीस उपस्थित असलेल्या दीपकच्या मित्रांना चौकशीसाठी बोलवत होते. मात्र, रविवारी (दि.१३) पार्टीत हजर असणारा विजय जाधव याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी गोदापात्रात दीपकचा मृतदेह तरंगताना आढळून आला. गुरुवारी (दि.१७) सकाळी दीपकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातमध्ये दीपकचा खून करण्यात आल्याचे समोर आले. ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी दीपकच्या मित्रांना ताब्यात घेतले.

म्हणूनच मित्राचे विषप्राशन

- Advertisement -

दीपक बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर गांगपूर पोलिसांनी तपास सुरू केला. बेपत्ता होण्याआधी तो त्याच्या मित्रासोबत असल्याने पोलिसांनी त्याच्या मित्रांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. तशी जशी गरज पडेल तसे पोलीस ठाण्यातून त्यांना बोलवण्यात येत होते. परंतु, मित्रांमधील विजय जाधवने सतत चौकशीला बोलावले जात असल्यामुळे विषप्राशन करून घेत आत्महत्या केली. दीपकचा खून झाला आहे आणि आपण त्याच्या खुनाच्या गुन्ह्यात सापडू याच भीतीने विजयने विष प्राशन केले का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -