घरताज्या घडामोडीधक्कादायक! वाघीण आणि तीच्या २ बछड्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं!

धक्कादायक! वाघीण आणि तीच्या २ बछड्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं!

Subscribe

१० जूनला वाघिणीचा तर १४ जूनला बछड्यांचा मृतदेह वनविभागाला सापडला.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सीतारामपेठ गावाशेजारी मृत्युमुखी पडलेल्या 3 वाघांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे. गावकऱ्यांनी विषप्रयोग करून तिन्ही वाघांना मारल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.  कोंडेगाव येथील तीन ग्रामस्थांनी विषप्रयोग करून या वाघांना मारल्याचे स्पष्ट झालं आहे.  सूर्यभान ठाकरे, श्रवण मडावी, नरेंद्र दडमल अशी आरोपींची नावे आहेत. गावाशेजारी असलेल्या मोह फुलाच्या अवैध दारू अड्ड्यापाशी सतत येणारी ही वाघीण व तिचे बछडे  यांच्यावर विषयप्रयोग केला आणि संपवले.

यंदा दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कठोर लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी दारूची तस्करी कमी झाली. त्यामुळे  स्थानिक मोह फुलाच्या दारूची मागणी वाढली. अशातच कोंडेगाव तलाव परिसरात आरोपींनी तयार केलेल्या मोह फुलाच्या दारू अड्ड्यापाशी ही वाघीण रोज येत असे .फेब्रुवारीपासून विदर्भातील जंगलात मोह फुलांचा हंगाम सुरू होतो. त्यासोबतच दारू गाळण्याचे अवैध अड्डे देखील जंगलात सुरू होतात. या तीन आरोपींनी मृत रानडुकरावर विषारी पावडर टाकून ठेवली होती. वाघीण व बछड्यानी हेच रानडुक्कर खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

१० जूनला वाघिणीचा तर १४ जूनला बछड्यांचा मृतदेह वनविभागाला सापडला. दरम्यान व्हिसेराचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात कोंडेगाव येथील 3 आरोपींनी हा विषप्रयोग केल्याचे निष्पन्न झाले आहे.


हे ही वाचा – महत्त्वाची बातमी! चिनी वस्तूंना भारतातून हद्दपार करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -