घरमहाराष्ट्रधक्कादायक! नागपूर कारागृहात फाशीच्या कैद्यासह नऊ जणांना कोरोनाची लागण

धक्कादायक! नागपूर कारागृहात फाशीच्या कैद्यासह नऊ जणांना कोरोनाची लागण

Subscribe

या सर्व बाधित कैद्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना कारागृहातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. या कारागृहातील फाशीच्या कैद्यासह नऊ जण कोरोना बाधित आढळण्याने खळबळ उडाली आहे. यात एका कारागृह रक्षका लाही कोरोनाची लागण झाली आहे.
या कारागृहात सध्या २२०० कैदी आहेत. दोन दिवसांपासून कैद्यांना कोरोना लस दिली जात आहे.

पहिल्या दिवशी २०० कैद्यांना लस देण्यात आली. दरम्यान गुरुवारी लसीकरण सुरु असताना एका कैद्याची प्रकृती खालवली. या कैद्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. याचवेळी इतर काही कैद्यांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळली. शनिवारी रात्री जवळपास आठ कैद्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे जाणवू लागली. या सर्वांना रविवारी दुपारी तपासणीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. त्यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी हे सर्व आठ कैदी कोरोनाबाधित आढळून आले.यावेळी एक कारागृह रक्षकालाही कोरोना लागण झाली आहे.

- Advertisement -

या सर्व कैद्यांना रविवारी उपचारांसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना कारागृहातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर कारागृह रक्षकास गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या कोरोनाबाधित कैद्यांमध्ये तीन फाशीची शिक्षा झालेले कैदी, तर मोक्का आणि एमपीडीएचा प्रत्येकी एक आणि तीन कच्चा कैदी असे एकूण आठ कैदी असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नागपूर कारागृहात शिक्षा भोगणारा कुख्यात गुंड अरुण गवळीसह २२ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -