घरमहाराष्ट्रआज नाट्यसंमेलनाची तिसरी घंटा वाजणार

आज नाट्यसंमेलनाची तिसरी घंटा वाजणार

Subscribe

नाट्यदिंडी नागपूरकरांसाठी विशेष आकर्षण

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ९९वेे नाट्य संमेलन शुक्रवारपासून नागपूर येथे होत आहे. पुढच्या वर्षी या परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन असल्यामुळे या नाट्य संमेलनाला महत्व प्राप्त झाले आहे. उद्घाटन सोहळा शुक्रवारी, सायंकाळी 6.30 वाजता ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे महापौर नंदा जिचकार हे उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी 3.00 वाजता निघणारी दिंडी ही नाट्यप्रेमींना नागपूरकरांसाठी विशेष आकर्षण असणार आहे, शिवाजी पुतळा, गांधीगेट ते रेशीमबाग मैदान असा या दिंडीचा प्रवास असणार आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन यात घडणार आहे. या निमिताने संस्था, शाळा, कॉलेज, जनजागृतीच्यादृष्टीने देखावे सादर करणार आहेत. प्रख्यात नाटककार पुरूषोत्तम दारव्हेकर या मुख्य रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहे.

- Advertisement -

नाट्यसंमेलनाच्या माजी अध्यक्षा कीर्ती शिलेदार आणि नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने संमेलनाच्या एका दिवस आगोदरच कार्यक्रमाला प्रारंभ केलेला आहे, 22 ते 25 फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे.

सर्व थरातील कलाकारांना सामावून घेणारा कार्यक्रम इथे होणार आहे. गीता गायन, काव्य, नाट्यप्रवेश, एकांकिका, नाटक, परिसंवाद असे अनेक कार्यक्रम या संमेलनाचे आकाशात असणार आहे. या निमित्ताने हौशी, सेलिब्रीटी कलाकारांचा या संमेलनात सहभाग आहे. 22 तारखेच्या रात्री अभिनेता भारत जाधव यांचे ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक सादर होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -