घरदेश-विदेशतुमच्या कामाची बातमी : 1 एप्रिलपासून बदलणार नियम; UPI द्वारे होणारे पेमेंट महागणार?

तुमच्या कामाची बातमी : 1 एप्रिलपासून बदलणार नियम; UPI द्वारे होणारे पेमेंट महागणार?

Subscribe

1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीसोबतच UPI व्यवहार देखील महाग होण्याची शक्यता आहे

1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीसोबतच UPI व्यवहार देखील महाग होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट्सबाबत एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये 1 एप्रिलपासून UPI ​​द्वारे केलेल्या व्यापारासाठी केलेल्या पेमेंटवर PPI शुल्क लागू करण्याची शिफारस केली आहे.

इतके शुल्क आकारले जाऊ शकते

बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार, मंगळवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, NPCI इंटरचेंज सेट करू शकते.
हे शुल्क 0.5-1.1 टक्के लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. परिपत्रकात, UPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI लादण्याची सूचना करण्यात आली आहे. हे शुल्क व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागेल.

- Advertisement -

70% व्यवहार 2 हजार रुपयांपेक्षा जास्त

NPCI च्या परिपत्रकानुसार,  1 एप्रिलपासून तुम्ही UPI पेमेंट म्हणजेच Google Pay, Phone Pay आणि Paytm सारख्या डिजिटल माध्यमातून 2,000 रुपयांपेक्षा जास्तच किमतीचा व्यवहार केल्यास तुमच्याकडून कर आकारला जाईल.  अहवालानुसार, UPI PayTM व्यवहारांपैकी सुमारे 70 टक्के व्यवहार 2,000 रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे आहेत, अशा परिस्थितीत 0.5 ते 1.1 टक्के शुल्क आकारले जाऊ शकते.

- Advertisement -

इंटरचेंज शुल्क आहे तरी काय?

हस्तांतरण शुल्क अर्थात इंटरचेंज फी एका बॅंकेद्वारे दुस-या बॅंकेकडून व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी आकारली जाते. UPI व्यवहारांच्या बाबतीत, इंटरचेंज फी व्यापा-याच्या बॅंकेद्वारे देणा-याच्या बॅंकेला दिली जाते.

कोणाला द्यावे लागणार शुल्क?

NPCI कडून प्रस्तावित शुल्काचा फटका पेमेंट देणा-या अर्थात वापरकर्त्याला बसणार नाही. तर हे शुल्क फक्त मोबाईल वाॅलटेसारख्या प्रीपेड पेमेंट इन्स्टूमेंट्स वापरुन 2 हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट स्वीकारणा-या व्यापा-यांना हे लागू होईल. थोडक्यात व्यापा-यांना UPI वापरुन वैयक्तिक व्यवहार करणा-या वैयक्तिक वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. थोडक्यात तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणींना UPI द्वारे पैसे पाठवत असाल किंवा स्वीकारत असाल तर त्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क बसणार नाही.

( हेही वाचा: NaMo App AI Tech : आता पीएम मोदींसोबत मिळवता येईल फोटो, जाणून घ्या सविस्तर )

RBI कडून शिक्कामोर्तब नाही 

UPI व्यवहारांसाठी 1.15 टक्क्यांपर्यंत जे शुल्क सुचवले जात आहे, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय भारतातील पेमेंट सिस्टमचे नियमन करणारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया घेईल. NPCI ने आपला प्रस्ताव RBI कडे सादर केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -