Homeमहाराष्ट्रVoting List Difference : महाराष्ट्रात प्रौढांची संख्या 9.54 कोटी, आयोगाकडे 9.70 कोटी...

Voting List Difference : महाराष्ट्रात प्रौढांची संख्या 9.54 कोटी, आयोगाकडे 9.70 कोटी मतदार कसे?

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची जी संख्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दाखविली होती, त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसच्या डेटा अ‍ॅनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष आणि प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची जी संख्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दाखविली होती, त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसच्या डेटा अ‍ॅनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष आणि प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले. (The number of adults in Maharashtra is 9.54 crore so how come the Commission has 9.70 crore voters)

महाराष्ट्रात प्रौढ पुरुष आणि महिलांची एकत्रित संख्या 9 कोटी 54 लाख असल्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2024 मध्ये दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाकडे विधानसभा निव डणुकीवेळी राज्यात 9 कोटी 70 लाख मतदारांची नोंद असल्याचे सांगण्यात आले होते. या आकडेवारीनुसार थेट 16 लाख मतदार कसे वाढले, असा सवाल प्रविण चक्रवर्ती यांनी उपस्थित करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात या संदर्भात एक लेख लिहून निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवले आहे. दरम्यान, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना दिलेली आकडेवारी आणि मतदान झाल्यानंतर दिलेल्या आकडेवारीतही तफावत दिसून आली आहे.

यावरून विरोधकांकडून महायुतीवर टीकास्त्र सोडले जात असले तरी, महाविकास आघाडीची स्थिती याहून वेगळी नाही. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या. त्यातही समाजवादी पार्टी (2), माकपा (1) आणि एमआयएम (1) यांची साथ ध्यानी घेता, महाविकास आघाडीचे संख्याबळ जवळपास 50 आहे. विरोधी पक्षनेतेपदाची माळ ठाकरे गटाच्या गळ्यात पडणार, हे स्पष्ट आहे. तथापि, महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडून या पदासाठी प्रस्ताव आलेला नाही. प्रथेनुसार प्रस्ताव आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापूर्वीच मांडलेली आहे.

हेही वाचा – MHADA Konkan Mandal : कोकण मंडळाच्या 2147 घरांची ऑनलाइन सोडत 5 फेब्रुवारीला

सर्वाधिक आमदार असलेल्या ठाकरे गटाकडे हे पद जाण्याची दाट शक्यता असली तरी यासाठी कोणाची निवड करायची यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तब्बल सातव्यांदा आमदार झालेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्याकडे विधानसभेच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याशिवाय, तीन टर्म आमदार असलेल्या सुनील प्रभू यांच्याकडील मुख्य प्रतोदपद कायम ठेवण्यात आले आहे. तर, आताची दुसरी टर्म असलेल्या आदित्य ठाकरे यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी या तिघांची नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल भास्कर जाधव यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती, हे उल्लेखनीय. मंत्रिपद मिळेल असे वाटले होते, पण न मिळाल्यामुळे मलाही आश्चर्य वाटले आहे. उद्धव ठाकरे यांनी मला शब्द दिला होता, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.

त्यातच, विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असताना विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या हाती आहेत. आता त्यांच्या सदस्यत्वाची मुदत येत्या ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्याअनुषंगाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचाही दावा आहे. नाना पटोले यांनी अलीकडेच यासंदर्भात पुण्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती, असे समजते. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपद तिन्ही पक्षांमध्ये वाटून घेण्याच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा झाली आणि त्याला शरद पवार यांनी हिरवा सिग्नल दिल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – Aaditya Thackeray : ज्यांना महाराष्ट्र अदानींच्या हातात द्यायचाय, त्यांनीच गद्दारी करावी, ठाकरेंचा इशारा

तिन्ही पक्षांना संधी

विरोधी पक्षनेतेपदासाठी नेता निवडण्याचे सर्वाधिकार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि एनसीपी एसपीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे आहेत. विधानसभेचा इतिहास लक्षात घेता, ठाकरे गट, काँग्रेस आणि एनसीपी एसपी या तिघांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी 2-2-1 या फॉर्म्युल्याचा अवलंब करावा, असे काही आमदारांचे म्हणणे आहे. म्हणजेच, ठाकरे गटाकडे सुरुवातीची दोन वर्षे, काँग्रेसकडे नंतरची दोन वर्षे तर, एनसीपी एसपीकडे शेवटचे वर्ष असे हे पद देण्याचे प्रस्तावित आहे.

काँग्रेस आणि एनसीपी एसपीकडून कोण?

ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे यांच्या नावांवरून घोळ सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी, काँग्रेस आणि एनसीपी एसपी या दोन पक्षांकडूनही कोणाचे नाव असेल याचीही चर्चा आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे. शिवाय, एनसीपी एसपीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांची नावे आघाडीवर आहेत.

हेही वाचा – NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्यावर काय चर्चा; अजित दादांच्या आमदाराने सांगितली आतली बातमी

5 वर्षांत 4 विरोधी पक्षनेतेपदाचा इतिहास

राज्यामध्ये 1985 ते 1990 या कालावधीत कमी संख्या असलेल्या जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या तब्बल चौघांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले होते. या निवडणुकीत 161 जागा जिंकून काँग्रेस सत्तेवर आली. त्यावेळी काँग्रेस (एस)चे नेते शरद पवार विरोधी पक्षनेते होते. मात्र, त्यांनी 1986 मध्ये शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर जनता पार्टीचे निहाल अहमद (14 डिसेंबर 1986 ते 26 नोव्हेंबर 1987), शेकापचे दत्ता पाटील (27 नोव्हेंबर 1987 ते 22 डिसेंबर 1988), जनता पार्टीच्याच मृणाल गोरे (23 डिसेंबर 1988 ते 19 ऑक्टोबर 1989) तर, त्यानंतर पुन्हा एकदा शेकापचे दत्ता पाटील (20 ऑक्टोबर 1989 ते 3 मार्च 1990) विरोधी पक्षनेते झाले. त्यावेळी जनता पार्टीकडे 20 तर, शेकापच्या 13 जागा होत्या, हे उल्लेखनीय. पुण्यामध्ये नाना पटोले यांच्यासमवेत झालेल्या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी हाच दाखला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीतील मतदान

पुरुष मतदार 4,37,057
महिला मतदार 3,06,49,318
अन्य मतदार 1820
एकूण मतदान 6,40,88,195

हेही वाचा – Amit Shah : शरद पवार साहेब मार्केटिंग नेता बनून फिरणं पुरेसं नाही; अमित शहांनी मागितला दहा वर्षांचा हिशेब

राजीव कुमार काय म्हणाले होते?

महाराष्ट्रातील विधानसभेवेळचे मतदार
एकूण मतदार ९ कोटी ६३ लाख
पुरुष मतदार ४ कोटी ९७ लाख
महिला मतदार ४ कोटी ६६ लाख

राजीव कुमार आणि आयोगाच्या पत्रकात नेमकी तफावत काय?

राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना राज्यात 9 कोटी 63 लाख मतदार असल्याचे म्हटले होते. पण राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने जी माहिती दिली होती, त्या नुसार राज्यात 9,70,25,119 मतदार होते आणि त्यापैकी 6,40,88,195 मतदारांनी मतदानाचा हक्क हक्क बजावला. त्याची टक्केवारी 66.05 दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या आकडेवारीमध्येही तफावत असल्याचे दिसते.