घरCORONA UPDATEरायगडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३० पार

रायगडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३० पार

Subscribe

रायगडमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३० पार गेला आहे. त्यामुळे रायगडमधील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३० पार गेला आहे. यामध्ये पनवेल महानगर पालिका हद्दीतील २६ तर उलवे परिसरातील ४ जण आणि उरणमधील २ जणांचा समावेश आहे. तर यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून चार जण कोरोनामधून पूर्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

३४७ जणांची कोरोनाची चाचणी

रायगड जिल्ह्यातील ३४७ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यातील ३२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर केंद्रीय सुरक्षा दलातील ११ तर १५ अन्य व्यक्तीचा तसेच पनवेल ग्रामीण आणि उरण मधील एकूण ६ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर पनवेल, नवीमुंबई आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

३ नवीन रुग्णांची भर

पनवेल महानगर पालिका हद्दीत मंगळवारी आणखी तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर खारघर येथील ओला टॅक्सी चालकाच्या संपर्कातील दोघांना तर घोट गावातील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर अलिबागमधील दोघांचे, पेण मधील एकाचा तर उरण मधील पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २२ जणांचे अहवाल सध्या प्रलंबित आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतो कि तेवढाच राहतो, हे पहावे लागणार आहे.


हेही वाचा – CoronaVirus:  राज्यात ८७ हजार गुन्हे दाखल तर १७ हजार व्यक्तींना अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -