घरCORONA UPDATECorona Update: राज्यात कोरोना रुग्णांनी पार केला २० लाखांचा आकडा

Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांनी पार केला २० लाखांचा आकडा

Subscribe

दिवसभरात २८,८८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात मागील १० महिन्यांपासू कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकड्याने २० लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आज (गुरुवार २१ जानेवारी २०२१) राज्यात २८,८८८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे एका आरोग्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. आज(गुरुवार) सापडलेल्या नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यासह महाराष्ट्रातील कोविड -१९ रुग्णांची संख्या २०,००,००० वर पोचली आहे. मार्च २०२० च्या दुसर्‍या आठवड्यात राज्यात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता.

सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यात १० लाख कोरोना रुग्णांचा आकडा पार झाला होता. यानंतर आता २० लाख कोविड -१९ प्रकरणांचा आकडा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेही राज्य ठरले आहे. या कोरोना संसर्गामुळे राज्यात आणखी ५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या ही ५०,६३४ वर पोचली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

- Advertisement -

गुरुवारी दिवसभरात ३,९८० रूग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आणि त्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही १९,०३,४०८ वर पोहोचली आहे. राज्यात कोविड -१९ चे, ४५,६२२ सक्रिय प्रकरणे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुंबई शहरात ५२७ नवीन रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३,०४,६५३ वर पोचली आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून ११,२७८ झाली आहे, आणखी १० रूग्णांना संसर्ग झाल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -