घरCORONA UPDATEकोरोनाग्रस्तांची सेवा करणा-या 'त्या' नर्सला शेजा-यांकडून तुच्छतेची वागणूक

कोरोनाग्रस्तांची सेवा करणा-या ‘त्या’ नर्सला शेजा-यांकडून तुच्छतेची वागणूक

Subscribe

कोरोनाबाधित रूग्णांची सेवा करणाऱ्या त्या नर्सला शेजाऱ्यांकडून तुच्छतेची वागणूक दिली जात आहे.

कोरोनाविरोधात लढा देणारे डॉक्टर, नर्स आणि पोलीस यांच्यासाठी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात टाळ्या वाजवून कौतुक केल्याचा प्रकार घडला असतानाच, दुसरीकडे मात्र,  कोरोनाबाधित रूग्णांची सेवा करणाऱ्या त्या नर्सला शेजाऱ्यांकडून तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात घडला आहे. परंतु, त्या नर्सने पेालिस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे. त्या शेजा-यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कल्याण कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या दर्शना बहिरम या नायर हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. डॉक्टर आणि नर्स कोरोनाग्रस्त रुग्णांची देवदूतासारखी सेवा करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्यांच्या सेवेचा अभिमान व्यक्त होत आहे. मात्र, ती नर्स असल्याने तिला शेजा-यांकडून मानसिक त्रास दिला जात आहे. तिच्या अंगावर थूंकतात, तिच्या चप्पला काठीने उचलून फेकून देतात,  घर सोडून जा अशा प्रकारचे किळसवाणे वर्तन करीत असल्याचे दर्शना यांनी पत्रकारांना सांगितले.
शेजा-यांकडून होणा-या रोजच्या तिरस्काराला ती नर्स खूपच कंटाळली आहे. तिने या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांकडून कोणतीच कार्यवाही केली नसल्याने तिने नाराजी व्यक्त केली. कोरोना विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री हे देशातील जनतेला घरी बसण्याचे आवाहन करीत आहेत तर दुसरीकडे या रोगाची लागण झालेल्या रुग्णाची सेवा, उपचार अनेक डॉक्टर व नर्सेस देवदुतासारखे करीत आहेत. अशा देवदुताचा अभिमान बाळगणे सोडून त्यांचा तिरस्कार करणाऱ्या शेजाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -