मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी महायुतीकडून सरकार स्थापन होताना दिसत नाहीय. त्यामुळे महायुती सरकारमधून मुख्यमंत्रीपदाची संधी कोणाला मिळणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? तसेच कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. मात्र आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त सांगितला आहे. (The oath-taking ceremony of the Mahayuti will be held on December 5 at 5 pm at Azad Maidan)
राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. विशेष म्हणजे 288 जागांपैकी तब्बल 235 जागांवर महायुतीने विजय मिळवला. मात्र स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा महायुतीकडून सत्ता स्थापनेकरता उशीरा होताना दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाकरता जोरदार रस्सीखेच अद्यापही सुरू आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचीही भेट घेतली. मात्र त्यानंतरही गेल्या दिवसांपासून सत्तास्थापनेबाबत काहीच हालचाल होताना दिसत नव्हती. अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महायुतीच्या शपथविधीबाबत माहिती दिली.
हेही वाचा – Ajit Pawar : जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? अजितदादांचा बाबा आढाव यांना थेट प्रश्न
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, महाराष्ट्रातील आणि देशातील संपूर्ण जनता महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह कधी होणार? याची वाट बघत आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, तो आनंदाचा क्षण आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी 5 वाजता शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024
हेही वाचा – Uddhav Thackeray : शिंदे दरे गावी गेल्याने ठाकरेंची जहरी टीका; राक्षसी बहुमत मिळाल्यानंतरही…