करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांची मोठी कोंडी झाली आहे. मुंबई आणि पुण्यात अनेक नागरिक दुचाकी आणि सायकलने आपले घर गाठत आहेत. मात्र, एका वृद्ध व्यक्तींने आपल्या पत्नीच्या औषधासाठी घोड्यावरुन सोलापूर शहर गाठल्याचे समोर आले आहे.
यामुळे करावा लागला घोड्यावरुन प्रवास
देशात आज लॉकडाउनचा तिसरा दिवस असून अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सगळी दुकाने बंद करण्यात आली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेची मोठी कोंडी झाली आहे. गावातून शहरात जाण्यासाठी कोणतेच वाहन नसल्यामुळे अनेकांना पायी जावे लागत आहे. यामध्ये वृद्धांचे फार हाल होताना दिसत आहे. अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ गावातील दस्तगीर पठाण या वृद्धाने तर चक्क बायकोच्या औषधासाठी अक्कलकोटमधून सोलापूर गाठले. पठाण यांचे हे पत्नीप्रेम पाहून सारेच थक्क झाले आहे.
हेही वाचा – करोनामुळे नाही तर मद्यसेवनामुळेच इराणमध्ये सर्वाधिक मृत्यू