घरताज्या घडामोडीआडगाव पोलिसांकडून ७२ वाहने मूळमालकांना मिळणार परत

आडगाव पोलिसांकडून ७२ वाहने मूळमालकांना मिळणार परत

Subscribe

सातपूर, पंचवटी, मुंबई नाका पोलीस ठाण्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेल्या ७२ बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. लवकरच वाहने मूळ मालकांच्या स्वाधीन केली जाणार आहेत. यामध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहनांची पाहणी करून वाहनमालकांनी कागदपत्रे दाखवून ती घेऊन जावीत. वाहनांचे मालक न आल्यास त्याचा लिलाव करण्यात येणार आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी सांगितले.

नाशिक महानगरातील चोरीस गेलेली वाहने, बेवारस, अपघातासह विविध गुन्ह्यातील वाहनांच्या मूळ मालकाचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकार्यांना दिले आहेत. अनेक वर्षांपासून महानगरातील पोलीस ठाण्यांच्या आवारात वाहने मूळ वाहनमालकांच्या प्रतिक्षेत धूळखात पडलेली आहेत. नाशिक शहरात पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांच्या संयुक्त विद्यमाने बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेतला जात आहे. आडगाव पोलिसांनी ७२ वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -