घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राची जनता शिंदे गटाला आपली घरं दाखवतील, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

महाराष्ट्राची जनता शिंदे गटाला आपली घरं दाखवतील, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

Subscribe

राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अनेक सवाल केले आहेत. विविध प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावारून अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. 40 आमदारांना घरी बसवण्यासाठी लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. निवडणूक लागतील आणि जनता यांना आपली घरं दाखवतील, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला.

अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने घोषणा केलेला आनंद शिधा अजूनही मिळतोय, निदान तुळशीच्या लग्नापर्यंत मिळावी, अशी अपेक्षा असं अरविंद सावंत म्हणाले. तसेच 40 आमदारांना घरी बसवण्यासाठी लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. महाराष्ट्राची जनता या लोकांना आपली घरं दाखवतील, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं.

- Advertisement -

प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ज्या पद्धतीने टाईमलाईन देऊन सत्ताधाऱ्यांची चिरफाड केली आहे, हिंमत असेल तर समोर या आणि बोला, असं आव्हानही अरविंद सावंत यांनी 40 आमदारांना दिलं आहे.

वेदांता – फॉक्सकॉनसंदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – अतुल लोंढे

- Advertisement -

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे. पण त्याचे खापर मात्र महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वेदांता आणि वेदांता-फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत पण फडणवीसांकडून याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाची खलबतं सुरू; पदाधिकारी, नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -