घरमहाराष्ट्रदहावी फेरपरीक्षेचा निकालाचा टक्का घसरला; मुंबईही मागे

दहावी फेरपरीक्षेचा निकालाचा टक्का घसरला; मुंबईही मागे

Subscribe

दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये यासाठी चालू वर्षातच फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तरिही या परिक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत घसरलेला आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्डाच्या फेरपरीक्षेचा निकालाचा टक्का यंदा घसरल्यानंतर दहावी बोर्डाचा निकालाचा टक्काही गेल्यावर्षीच्या तुलनेत घटला आहे. राज्य शिक्षण मंडळाने बुधवारी जाहीर केलेल्या या निकालाच्या आकडेवारीनुसार यंदा या परीक्षेचा निकाल २३.६६ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी या परीक्षेचा निकाल २४.४४ इतका होता. तर यंदा मुंबई विभागीय मंडळाच्या निकालात ही तीन टक्क्यांनी घसरण झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. यंदा मुंबई विभागाचा निकाल १४.२१ टक्के लागला आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये, यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून दहावी आणि बारावी बोर्डाची जूलैमध्येच फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा या परीक्षेत एकूण १ लाख २२ हजार १७ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण १ लाख २१ हजार ५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २८ हजार ६४५ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना या निकालाची गुणपडताळणी करायची असेल, त्यांना ९ स्पटेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

- Advertisement -

मागच्यावर्षीच्या तुलनेत घसरण

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत घसरण पहायला मिळाली आहे. गेल्यावर्षी दहावी फेरपरीक्षेचा निकाल २४.४४ टक्के लागला होता. तत्पूर्वी २०१६ च्या परीक्षेत निकाल निकाल २७.९७ टक्के इतका होता. यंदाच्या या परीक्षेत

औरंगाबाद विभाग – निकाल ३२.८३ टक्के
एकूण विद्यार्थी  – १२ हजार ९५९
उत्तीर्ण विद्यार्थी – ४ हजार २५५

- Advertisement -

तर मुंबई विभाग – निकालाची टक्केवारी १४.२१ टक्के
एकूण विद्यार्थी – ३३ हजार ३९७
उत्तीर्ण विद्यार्थी – ४ हजार ७४७

यंदाचा निकाल समाधानकारक असल्याचे मत यावेळी मुंबई विभागीय मंडळातर्फै व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -