घरमहाराष्ट्रडास निर्मूलनाबाबत मुंबईची कामगिरी देशासमोर आदर्श ठरावी -आयुक्त

डास निर्मूलनाबाबत मुंबईची कामगिरी देशासमोर आदर्श ठरावी -आयुक्त

Subscribe

पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी डास निर्मूलनाबाबत देशासमोर आदर्श ठरावी अशी कामगिरी मुंबईतील आरोग्य यंत्रणेने करून दाखवावी, असे आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी केले आहे.

पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी डास निर्मूलनाबाबत देशासमोर आदर्श ठरावी अशी कामगिरी मुंबईतील आरोग्य यंत्रणेने करून दाखवावी, असे आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी केले आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या भाग असलेल्या कीटकनाशक विभागाकडून पावसाळापूर्व तयारीसाठी उपाययोजनांना सुरूवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून, विविध शासकीय, निमशासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात बुधवारी पार पडली.  (The performance of Mumbai regarding Das Nirmulana it will be ideal in front of the country Commissioner Iqbal singh Chahal  )

यावेळी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रावण हर्डीकर, सहआयुक्त (सुधार) रमेश पवार, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निमशासकीय घटक संस्था आणि विविध प्राधिकरणांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

पावसाळी आजारांना रोखण्यासाठी, पावसाळापूर्व कामांमध्ये डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, ही बाब सर्वाधिक महत्त्वाची असते. डास निर्मूलनाच्या उपाययोजना प्रचलित असल्या तरी त्यांच्या अंमलबजावणीत कोणतीही कसर ठेवू नये. तसेच, प्रत्येक शासकीय, निमशासकीय यंत्रणेने डास निर्मूलनाच्या वार्षिक मोहीमेसाठी आर्थिक तरतूद करावी, असे फर्मान आयुक्तांनी काढले आहे. शासकीय, निमशासकीय प्राधिकरणांच्या इमारतींवरील टाक्या डास प्रतिबंधक करण्याबाबत व अडगळीचे साहित्य निष्कासित करण्याबाबत या समितीच्या बैठकीत आढावा घेऊन चर्चा करण्यात आली.

२२ हजार ८४८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही

मुंबईतील विविध शासकीय, निमशासकीय ६७ यंत्रणांच्या परिसरात मिळून एकूण २८ हजार ८८५ पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी २२ हजार ८४८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही केली आहे. तर ६ हजार ३७ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना प्रलंबित आहेत. पावसाळापूर्व कामांमध्ये विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही ८० टक्के पूर्ण झाली आहे, अशी माहिती कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

( हेही वाचा: शरद पवारांच्या निर्णयामुळे मविआची ‘वज्रमूठ’ सुटली, पुढील सभा होण्याची शक्यता कमी )

जून महिन्यात डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम

मुंबई महापालिका क्षेत्रामध्‍ये हिवताप (मलेरिया), डेंगी व तत्‍सम आजारांना प्रतिबंध म्‍हणून पालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत. त्याबाबत अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिका कीटकनाशक विभाग आणि संबंधित यंत्रणेच्या संयुक्त माध्यमातून डासांची उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठीची मोहीम राबविण्यात येणार आहे. यंत्रणांनी आपल्या परिसरात डास निर्मूलनाच्या विविध उपाययोजनांसाठी कीटकनाशक विभागाची मदत घ्यावी, असे आवाहनही चेतन चौबळ यांनी केले. यावेळी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी, मुंबईत डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने कमी करण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -