घरताज्या घडामोडीभाजपच्या आमदारांवर कारवाईची शक्यता; विधान परिषदेतील बोंबाबोंब भोवणार

भाजपच्या आमदारांवर कारवाईची शक्यता; विधान परिषदेतील बोंबाबोंब भोवणार

Subscribe

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण करीत सभागृहात आक्रमक पवित्रा धारण केला. यामुळे अनेक आमदारांना आता कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत अनेक आमदारांनी घोषणाबाजी करताना सभागृहात थेट शिमग्याप्रमाणे बोंबाबोंब सुरु केली. या बोंबाबोंब करणाऱ्या सहा आमदारांवर कारवाईचे संकेत विधान परिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले. या आमदारांमध्ये ज्येष्ठ सदस्य भाई गिरकर यांच्यासह निरंजन डावखरे, सुरजितसिंह ठाकूर सारख्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन विरोधकांनी विशेषत भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. याप्रकरणी मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केल्यानंतर सभागृहातही अनेक आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. दरम्यान, या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी तीन वेळा विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.

- Advertisement -

या गोंधळात विधान परिषदेचे कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी घोषणाबाजी करीत सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात करत सभागृहाचे कामकाज थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचे वित्त मंत्री जयंत पाटील यांना निवेदन करण्याची परवानगी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केला. त्यावेळी भाजपच्या काही आमदारांनी शिमग्याला देतात त्याप्रकारे बोंबाबोंब करण्यास सुरुवात केली. या गोंधळातच जयंत पाटील यांनी आपले निवेदन पूर्ण केले. त्यानंतर या बोंबाबोंब प्रकरणी उपसभापतींनी सभागृहाचे लक्ष वेधत विरोधकांची ही गोष्ट असंविधानिक असल्याचे स्पष्ट करताना याप्रकरणी लवकरच गटनेत्याची बैठक आयोजित करीत पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.

यात भाजपाचे ज्येष्ठ आमदार भाई गिरकर, निरजंन डावखरे, सुजितसिंग ठाकूर, गिरिष व्यास, अनिल सोले आणि रमेश पाटील या सदस्यांचा समावेश आहे. जर या आमदारांपैकी काही आमदारांवर कारवाई झाल्यास भाजपचे संख्याबळ विधान परिषदेतील कमी होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -