घरमहाराष्ट्रमुख्यमंत्रीपदाबाबत वाटाघाटी नाही, ५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री - संजय राऊत

मुख्यमंत्रीपदाबाबत वाटाघाटी नाही, ५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री – संजय राऊत

Subscribe

महाविकास आघाडीमध्ये अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री असेल असं ठरल्याचा दावा काहीजण करत आहेत. तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले पिढीला मुख्यमंत्री असतील असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून स्पष्ट केलेलं असताना पुन्हा एकदा नाशिकमध्ये रोखठोकपणे पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल असं संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते नाशिकमध्ये बोलत होते.

शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे. असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे आणि मला असं वाटतं की, शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच वक्तव्यं केलंल आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आमच्या कुणाचाही मनात संभ्रम नाही. पण प्रसिद्धी माध्यमांमुळे लोकांच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून आणि मी त्या प्रक्रियेतील एक घटक होतो, अनेक गोष्टी माझ्या समोर घडलेल्या आहेत, मी साक्षीदार होतो म्हणून मी आपल्याला सांगतो की या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण काळासाठीच राहील. त्यामध्ये कोणताही वाटा किंवा घाटा होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

वाघाच्या मिशीला हात लावण्याची हिम्मत नाही

महाराष्ट्रातील राजकारणी आपण आहोत संस्कार आहेत, शत्रुत्व टोकाचं नसत, राजकारणात मतभेद असतात. चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या. वाघाच्या मिशीला हात लावण्याची हिम्मत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -