घरअर्थजगतमुंबईकरांच्या खिशाला कात्री! पोह्यांच्या दरात होणार वाढ

मुंबईकरांच्या खिशाला कात्री! पोह्यांच्या दरात होणार वाढ

Subscribe

आता सामान्यांना परडवणाऱ्या कांदापोह्यांच्या किमतीत वाढ होणार आहे. पोह्यांच्या वाढणाऱ्या किमतीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

पोहे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात प्रचंड लोकप्रिय असलेला नाश्त्याचा पदार्थ आहे. मुंबईमध्ये देखील कांदेपोहे विशेष प्रिय आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये सकाळी हॉटेल आणि स्टॉलवर पोहे पाहायला मिळतात. परंतु आता सामान्यांना परडवणाऱ्या कांदापोह्यांच्या किमतीत वाढ होणार आहे.

पोह्यांच्या वाढणाऱ्या किमतीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पोह्यांच्या किमतीत आता वाढ झाली असून विकत भेटणाऱ्या कांदे पोह्यांच्या किमतीत एका प्लेट मागे 5 ते 10 रुपये वाढ होणार आहे.

- Advertisement -

Pohe Wala in Mehrauli Gurgaon Road - Best Poha Outlets in Delhi - Justdial

 

- Advertisement -

सध्या बाजारात पातळ पोह्यांचा भाव 80 रुपये प्रति किलो असून जाड पोह्यांचा भाव 60 प्रति किलोवर पोहोचला आहे. खरं तर, तांदूळ महाग झाल्याने पोह्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शिवाय बाजारात पोह्यांची मागणी जास्त असून पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. त्यामुळे आता हॉटेल आणि स्टॉलवर 20 ते 25 रुपयांत मिळणार एक डिश आता 5 ते 10 रुपयांनी महाग होणार आहे.

वर्षभरात 10 ते 20 रुपयांनी वाढले दर

Kanda Batata Poha/Onion Potato Poha - CookForIndia.com

 

गेल्या वर्षभरात पोह्यांचे दर 10 ते 20 रुपयांनी वाढले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे रशिया-युक्रेनचे युद्ध देखीलल आहे. या युद्धापासूनच सगळीकडे महागाई वाढू लागली आहे. त्यामुळे तांदूळ आणि पोह्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. पोह्यांची मागणी जास्त असून पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.

 


हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -