घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेच्या 'या' प्रकल्पामुळे जागतिक पाणी संकटावर मात

मध्य रेल्वेच्या ‘या’ प्रकल्पामुळे जागतिक पाणी संकटावर मात

Subscribe

मध्य रेल्वेने उभारले पाच सांडपाणी प्रक्रिया केंद्र

मध्य रेल्वेच्या पर्यावरण व गृह व्यवस्थापन विभागाने २०२० मध्ये पहिल्यांदाच मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी केली आहे. मध्य रेल्वेवर आतापर्यंत एकूण 23 पाण्याचे प्रक्रिया प्रकल्प बसविण्यात आली आहेत, ज्यात मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, पाण्याचे री-सायकलिंग प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे. हे शुद्ध पाणी मध्य रेल्वेवर विविध कामांसाठी वापरले जाते. प्लॅटफॉर्मची साफसफाई करणे, स्थानकांवरील स्टॉल्सची साफसफाई करणे, कोचिंग डेपोमध्ये गाड्यांची साफसफाई करणे, गार्डन्स आणि वनस्पतींना पाणी देणे, प्रसाधन गृहात फ्लशिंगसाठी इत्यादी कामांसाठी त्याचा वापर केला जातो.

सामान्यत: वातावरणात सोडल्या जाणार्‍या घाणीचे प्रमाण या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांद्वारे कमी केले जाते. अशा प्रकारे प्रदूषण कमी केल्याने पर्यावरण अधिक शुद्ध राहण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे जलशुध्दीकरण प्रकल्प, जागतिक पाणी संकटावर शाश्वत असे अल्प आणि दीर्घकालीन समाधान असल्याचे सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेने उभारले ‘हे’ पाच सांडपाणी प्रक्रिया केंद्र

१) माटुंगा कार्यशाळा – क्षमता ४० किलो लिटर / दिवस
२) पंढरपूर रेल्वे स्थानक – क्षमता ५० किलो लिटर / दिवस
३) मराठवाडा कोच फॅक्टरी, लातूर – क्षमता ७० किलो लिटर / दिवस
४) लातूर रेल्वे स्थानक – क्षमता १५ किलो लिटर / दिवस
५) इलेक्ट्रिक लोको कार्यशाळा, भुसावळ – क्षमता १५ किलो लिटर / दिवस

वरील पाच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह आता मध्य रेल्वेची सुमारे १० दशलक्ष लिटर दूषित पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अंनिसने पोलीसांच्या मदतीने थांबवली जात पंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -