घरठाणेराऊतांविरोधात शिंदे गटाचं आंदोलन, पोस्टरवर थुंकून केला निषेध व्यक्त

राऊतांविरोधात शिंदे गटाचं आंदोलन, पोस्टरवर थुंकून केला निषेध व्यक्त

Subscribe

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थुंकण्याची कृती केली होती. संजय राऊत यांच्या या कृतीविरोधात शिंदे गट आक्रमक झाला आहे. डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेबाहेर शिवसैनिकांनी राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तसेच त्यावर थुंकत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

पोस्टरवर थुंकून निषेध व्यक्त

डोंबिवली शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेजवळ युवासेना महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे, डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश कदम, सागर जेधे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. यावेळी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत यांनी या प्रश्नावर थू म्हणत थुंकण्याची कृती केली होती. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा राज्यभरात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून ‘जोडे मारो’ आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अमरावतीमध्येही राजकमल चौकात शिंदे गटाने आंदोलन करत राऊत यांच्या फोटोला जोडे मारुन पोस्टर फाडण्यात आले.

धरणामध्ये XXXपेक्षा थुंकणं चांगलं

संजय राऊतांना अजित पवारांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं अशी खालच्या पातळीवर टीका केली. तसंच ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो

संजय राऊतांना थुंकल्याबद्दल माफी मागणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, रोज 130 कोटी जनतेला माफी मागावी लागेल. कारण रोज कोणी ना कोणी थुंकत असतो. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही, राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना, ठाकरे कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत बेईमानी केली, त्यांचे नाव समोर आल्यावर माझी जीभ चावली गेली आणि त्यातून ही कृती झाली. यांना काही कळतं का? त्यांना रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र कळतं का? असे प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, माझ्या इतके चांगले संतुलन कोणाचेच नाही. उलट माझ्यामुळे अनेकांचे संतुलन बिघडले आहे.

आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत – अजित पवार 

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. श्रीकांत शिंदे प्रकरणावरून पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. अजित पवार चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी गेले होते. यानंतर माध्यमांनी त्यांनी संजय राऊतांच्या टीकेप्रकरणी प्रश्न विचारला असता त्यांनी आधी ‘नो कॉमेंट्स’ म्हटलं. पण नंतर त्यांनी संजय राऊत यांच्या बोलण्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांना काय बोलायचे हा त्यांचा अधिकार असल्याचे अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : धरणामध्ये XXXपेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची अजित पवारांवर खालच्या पातळीवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -