घरमहाराष्ट्रAshok Chavan : तेलंगणातील खरे चित्र समोर येणारच होते, अशोकराव चव्हाणांची प्रतिक्रिया

Ashok Chavan : तेलंगणातील खरे चित्र समोर येणारच होते, अशोकराव चव्हाणांची प्रतिक्रिया

Subscribe

कधी ना कधी खरे चित्र समोर येणारच होते आणि वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे झाले, असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

नांदेड : तेलंगणातील बीआरएसचे राज्य सरकार केवळ सवंग प्रसिद्धीसाठी घोषित केलेल्या योजनांवर आणि अवास्तव प्रसिद्धीवर तगले होते. जाहिरातीत भलेही गुलाबी चित्र रंगवले जात होते, मात्र वस्तुस्थिती काळीकुट्ट होती. कधी ना कधी खरे चित्र समोर येणारच होते आणि वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे झाले, असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. तेलंगणात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा – Telangana Congress : तेलंगणातील काँग्रेसच्या विजयामागे ठाकरेंचा हात

- Advertisement -

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, बीआरएसने शेतकऱ्यांना वर्षाला केवळ 10 हजार रुपये देऊन इतर सर्व योजना जवळपास संपुष्टात आणल्या होत्या. तेलंगणात मोफत पीककर्ज नव्हते, पीकविमा नव्हता, एमएसपीनुसार शेतमाल खरेदीसाठी यंत्रणा नव्हती, खासगी खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचे शोषण सुरू होते. त्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत होत्या. सिंचन प्रकल्पांवरील खर्च वाढवून भ्रष्टाचार सुरू होता. राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. सरकारी मंडळे, महामंडळे, शासकीय योजनांसाठीच नव्हे तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यायलाही बीआरएसच्या राज्य सरकारकडे पैसा नव्हता. कर्ज काढून, सरकारी जमिनी विकून आणि अंदाधुंद पद्धतीने दारू दुकानांचे परवाने वाटून तेथील राज्य सरकार दिवस पुढे ढकलत होते. रोजगार निर्मिती, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे पूर्ण कानाडोळा करण्यात आला होता. त्यामुळेच तेलंगणाच्या मतदारांनी बीआरएसला नाकारून काँग्रेसला स्पष्ट बहुमताने निवडून दिले आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचे निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहेत. राजस्थानमध्ये अशोक गहलोत व छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चांगली कामे केली, चांगल्या योजना राबवल्या. दोघांचीही प्रतीमा उत्तम होती. या तीन राज्यातील निकालांचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून विश्लेषण करून उणिवा शोधल्या जातील व दुरुस्तही केल्या जातील, असेही अशोकराव चव्हाण यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -