Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र कर्जबाजारी शेतकऱ्याकडून पतसंस्थेच्या वसूली अधिकाऱ्याने थेट 'फोन-पे'वर घेतली लाच

कर्जबाजारी शेतकऱ्याकडून पतसंस्थेच्या वसूली अधिकाऱ्याने थेट ‘फोन-पे’वर घेतली लाच

Subscribe

नाशिक : पतसंस्थेचे ५ लाख रुपये कर्ज फेडले असतानाही तक्ररदाराकडून २० हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता ७ हजार रुपये स्विकारताना शुक्रवारी (दि.१५) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगरच्या पथकाने अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या कार्यालयात विशेष वसुली व विक्री अधिकार्‍यास अटक केली. यासिन नासर अरब (वय ४२) असे अटक केलेल्या विशेष वसुली व विक्री अधिकार्‍याचे नाव आहे.

यासिन अरब हे अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्री अधिकारी आहेत. तर तक्रारदार अहमदनगर तालुक्यातील भोरवाडी येथील आहेत. तक्रारदारांनी 2016 मध्ये भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.केडगाव (जि.अहमदनगर) येथून 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज घेतेवेळी तक्रारदारांनी त्यांच्या आई व मामाच्या नावे असलेली त्यांची भोरवाडी (ता.नगर) शिवारातील शेत गट नं 499 मधील 1 हे.30 आर क्षेत्र जमीन तारण म्हणून दिली होती.

- Advertisement -

तक्रारदारांना पतसंस्थेकडून कर्जफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत देण्यात आली होती. परंतु, तक्रारदार मुदतीत कर्ज फेड करू शकले नाही. त्यामुळे वसुलीबाबत भैरवनाथ पतसंस्थेने सहायक निंबधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार वसुली करण्यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था,अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनने 25 मे 2023 रोजी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीस तक्रारदारांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार तक्रारदार हजर झाले होते. त्यादिवशी तक्रारदारांनी फेडरेशनचे वसुली अधिकारी अरबकडे कर्ज फेड करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागितली. अरबने तक्रारदारांना तोंडी दोन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. त्यानंतर कर्ज फेड मुदतवाढीसाठी शुल्क 23 ऑगस्ट 2023 रोजी एक हजार रुपये शुल्क मागतले. त्यावेळी तक्रारदारांनी अरबच्या फोन पे वर एक हजार रुपये दिले. त्यावेळी अरबने कोणतीही शासकीय पावती दिली नाही.

तक्रारदारांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी भैरवनाथ पतसंस्थेचे सर्व कर्ज फेडले, तसा पतसंस्थेने कर्जनिल दाखला तक्रारदारांना दिला होता. त्यानंतर 4 ते ७ सप्टेंबर २023 या कालावधीत अरबने तक्रारदारांना वारंवार मोबाईलवर कॉल करून तुला कर्ज फेड करण्यास मुदत दिली. तुझ्या जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही. लिलाव होऊ दिला नाही. तुला मदत केल्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. पहिला हप्ता म्हणून 7 हजार रुपये व पुढील दोन दिवसानंतर 13 हजार रुपये देण्याचेही ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने गुरुवारी (दि.7) लाचलुच प्रतिबंधक विभाग, अहमदनगरकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला.

रोख पैसे नको, फोन पे वर पैसे पाठवा

- Advertisement -

पथकाने 8 सप्टेंबर 2023 रोजी सापळा रचला. मात्र, अरबने तक्रारदाराकडून रोख स्वरूपात लाच स्वीकारली नाही. त्याने लाचेची रक्कम फोन पे वर सेंड करण्यास सांगितले. शुक्रवारी (दि.15) अरब कार्यालयात होते. त्यावेळी तक्रारदाराने फोन पे वरून अरबला सात हजार रुपये दिले. तितक्यात पथकाने अरबला अटक केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाणे, नगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

- Advertisment -