घरमहाराष्ट्रकाळेश्वरी देवीचं मंदिर आठ दिवस बंद राहणार; काय आहे कारण?

काळेश्वरी देवीचं मंदिर आठ दिवस बंद राहणार; काय आहे कारण?

Subscribe

मांढरदेवी येथील काळेश्वरी देवीचे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे हे मंदिर 21 ते 28 या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे.

मांढरदेवी येथील काळेश्वरी देवीचे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे हे मंदिर 21 ते 28 या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे. या काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय नको, म्हणून प्रशासनाच्यावतीनं एक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी येथील सभामंडपात उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांची पूर्ण निराशा होणार नाही. या काळात भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे. (The repair work of the main body of Kaleshwari Devi temple at Mandhardevi will start)

मांढरदेव येथील काळेश्वरी किंवा काळूबाई देवींच मंदिर महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यांतील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी उत्सव काळातच नव्हे तर दररोज देखील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, देवीच्या मुख्य गाभाऱ्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या काळात भाविकांची थोडी गैरसोय होणार आहे. हे मंदिर 21 ते 28 सप्टेंबर या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे. या दिवसात भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

मांढरदेवी येथे देवीचं स्वयंभू स्थान (मुर्ती) असून चतुर्भूज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे. तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मुर्तीस शेंदूर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व इतरवेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसवला जातो. देवीचं वाहन सिंह हे आहे.

(हेही वाचा: भाजपचा प्लॅन बी तयार; आमदार अपात्रता प्रकरणात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता )

- Advertisement -

गौराईचं आज आगमन

21 सप्टेंबर रोजी गौराईचे देखील आगमन होईल. यादरम्यान, घरोघरी आलेल्या गौराईचा सुंदर साज श्रृंगार केला जातो. तिच्यासाठी गोडाधोडाचा नैवेद्य देखील केला जातो. राज्यभरात गौरी आवाहनच्या पहिल्या दिवशी गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर गौरी पूजनाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखला जातो. तर काही ठिकाणी गौराईला तिखटाचा नैवेद्या दाखवला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -