घरमहाराष्ट्रकोरोनाची टेस्ट न करताच रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; कुडाळ शहरातील धक्कादायक प्रकार

कोरोनाची टेस्ट न करताच रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; कुडाळ शहरातील धक्कादायक प्रकार

Subscribe

भाजपच्या महिला ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दिपलक्ष्मी पडते आणि शहर अध्यक्ष ममता धुरी यांनी प्रकार उघड केला.

रुग्णाची स्वॅब टेस्ट न करताच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्गमध्ये घडला आहे. ही घटना कुडाळ येथील कोरोना चाचणी सेंटरमध्ये घडली आहे. या अनागोंदी प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही धोकादायक बाब आहे. भाजपच्या ओबीसी सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा दिप्ती पडते व शहर अध्यक्षा ममता धुरी यांनी सांगून याबाबतचे निवेदन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक तसेच जिल्हाधिकारी यांना देऊन वेळीच लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

कुडाळ शहरातील एका महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. ही महिला आपल्या वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी जायचं होतं. त्यासाठी त्या महिलेला कोरोनाचा अहवाल आवश्यक होता. म्हणून सदर महिलेने कुडाळ येथील महिला रुग्णालयात स्वॅब टेस्टसाठी गेली. रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता तिथे तिचे नाव रजिस्टर करण्यात आले. त्यानंतर त्यांना सांगितले गेले की काही वेळात आपणास बोलावण्यात येईल. मात्र रजिस्ट्रेशन करून बोलावणे न आल्याने सदरील महिला निघून गेली. वेळ लागत असल्याने स्वॅब टेस्ट न देता निघून गेली. मात्र दोन दिवसांनी त्या महिलेस फोन आला की तुमचा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे, तो अहवाल आपण घेऊन जावा. हे समजताच कुडाळ येथील भाजपच्या महिला शहर अध्यक्षा ममता धुरी आणि ओबीसीच्या महिला जिल्हाध्यक्षा दीप्ती पडते यांना सांगून सदरील बाब ही कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांच्या कानावर घालत सदरील बाब गंभीर असून यावर लक्ष घालण्यासाठी आज कुडाळ तहसीलदार यांना भाजपच्या दीप्ती पडते आणि ममता धुरी यांनी निवेदन देत या अनागोंदी कारभाचा कसून तपास करा अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

कोरोनाची टेस्ट न करताच रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; कुडाळ शहरातील धक्कादायक प्रकार
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -