घरमहाराष्ट्रतीन महिन्यापूर्वी बांधलेल्या मोरीजवळील रस्ता खचला !

तीन महिन्यापूर्वी बांधलेल्या मोरीजवळील रस्ता खचला !

Subscribe

पावसाच्या रौद्र रूपासमोर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या सावरोली-खारपाडा राज्य मार्गाचा टिकाव लागला नसून, वाशिवली मोरीजवळ रस्ता खचून अर्धा अधिक भाग पाण्यात वाहून गेला आहे.सावरोली-खारपाडा राज्य मार्गावरून पाताळगंगा औद्योगिक वसाहतीकडे जाण्याच्या मार्गावर वाशिवली गावाजवळ पावसाळी ओढ्यावर तीन महिन्यांपूर्वीच मोठी मोरी बांधण्यात आली होती. दरवर्षी या ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याने मोरीची उंची वाढविण्यात आली होती. शिवाय रस्त्याचे डांबरीकरण देखील करण्यात आले होते. परंतु डोंगरातून वेगात येणार्‍या पावसाच्या पाण्याचा वेगाने रस्ता मोठ्या प्रमाणात खचून अर्धा अधिक भाग वाहून गेला आहे. वाशिवली ग्रामस्थांनी तातडीने अवजड वाहतूक बंद केली. एकेरी वाहतूक सुरू असली तरी कोणत्याही क्षणी रस्ता खचण्याची भीती असल्याने खबरदारी घेण्यात येत होती.

दांड आपटा मार्गावरदेखील रिस पुलावरून पाणी वाहत असल्याने पाताळगंगा औद्योगिक वसाहतीचा संपर्क तुटला होता. रसायनी पोलीस ठाणे, सिंडिकेट बँक, तसेच अनेक कारखान्यांत चार फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने सर्व कामकाज ठप्प झाले होते. मोहपाडा येथे सेबीची संरक्षक भिंत कोसळल्याने नवीन पोसरीत पाण्याचा लोंढा शिरला. जवळजवळ 50 घरांत पाणी शिरल्याने धान्य, कपडे, फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी तातङीने नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -