घरमहाराष्ट्रतीच जागा, तेच मैदान; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे देणार प्रत्युत्तर

तीच जागा, तेच मैदान; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे देणार प्रत्युत्तर

Subscribe

खेड – राज्यातील राजकीय शिमग्याला सुरुवात झाली असून उद्धव ठाकरे यांनी ज्या खेडमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला, त्या ठिकाणी शिंदे आता जाहीर सभा घेणार आहेत. १९ मार्चला खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या जाहीर सभेचं आयोजन केलं असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता पक्षबांधणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये जाऊन स्थानिक आमदार योगेश कदम यांना आव्हान दिले. तसंच, शिंदे गट, निवडणूक आयोग यांच्यावरही टीकास्त्र डागलं.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या यांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्याकरता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही तिथे जाणार आहेत. ‘शिवसेनेचे मुख्यनेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे १९ मार्चला खेड (रत्नागिरी) मध्ये.. शिवसेनेची जाहीरसभा.. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर.. कितीही आदळआपट करा योगेश कदमच आमदार.’, असं ट्वीट उदय सामंत यांनी केलं आहे.

हेही वाचा – ढेकणांना चिरडायला गोळीबार करायचा नसतो; उद्धव ठाकरेंचा टोला

- Advertisement -

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले आहे की, ढेकणं चिरडायला तोफांची गरज नाही. ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  भाजपा तसेच शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ही ढेकणं आपले रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरज नाही. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणांना चिरडणार आहे. तोफेची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना नाव आणि पक्ष माझ्या वडिलांनी दिले आहे. निवडणूक आयोगाने हे दिलेले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला नसेल तर त्यांना बोलवा येथे. त्यांना ही गर्दी दाखवा. हीच खरी शिवसेना आहे. हो मी शिवसेनाच म्हणणार आहे. कारण शिवधनुष्य रावणाला नाही पेलवले तर या गद्दारांना कसे पेलवणार. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला मान्य नाही. मान्य होणारच नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वच उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. आणि काचा फुटलेल्या एसटीवर लिहिलेले असते की गतिमान महाराष्ट्र. कसला गतिमान महाराष्ट्र. तरुणांचे रोजगार गेले. शेतकरी हवालदिल आहे. असे असताना लाज नाही वाटत गतिमान महाराष्ट्र म्हणायला. माझी जाहिरात होती की माझे कुटुंब. होय हे माझेच कुटुंब आहे. तुमच्यासारखे खोटे बोलत नाही. उद्धव ठाकरे हे भाषणाला येताच फटक्यांची आतिषबाजी झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले असाच आपल्याला धमका करायचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -