Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रLadki Bahin Yojna : निवडणुकीत गेम चेंजर लाडकी बहीण; सौनिक दाम्पत्य पडद्यामागील...

Ladki Bahin Yojna : निवडणुकीत गेम चेंजर लाडकी बहीण; सौनिक दाम्पत्य पडद्यामागील कलाकार

Subscribe

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने पुन्हा सत्ता काबिज केली. महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींनी दिलेली तब्बल 5.95 टक्के वाढीव मते गेम चेंजर ठरली आहेत. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेला लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम सौनिक दाम्पत्यांनी केले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने पुन्हा सत्ता काबिज केली. महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींनी दिलेली तब्बल 5.95 टक्के वाढीव मते गेम चेंजर ठरली आहेत. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेला लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम सौनिक दाम्पत्यांनी केले आहे. (The Saunik couple are the artists behind the Ladki Bahin scheme which became a game changer in the assembly elections)

लोकसभेतील पराभवानंतर सत्ताधारी महायुती (भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) बॅकफूटवर पडल्याने महाविकास आघाडीचा (काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) आत्मविश्वास कमालीचा उंचावला होता. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत लाडली बहन योजनेने भाजपाला पुन्हा सत्तापद मिळवून दिली होती. याच पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशीच योजना महाराष्ट्रातही राबवण्याचे एकमताने ठरवले. त्यानुसार या योजनेचा ड्राफ्ट तयार करण्याची जबाबदारी राज्याचे माजी मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन प्रधान सल्लागार मनोज सौनिक यांच्याकडे सोपवण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मविआ की महायुती, छोटे पक्ष-अपक्षांची साथ कोणाला?

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या मनोज सौनिक यांनी राज्याच्या तिजोरीतील जमाखर्चाचा ताळमेळ साधत ही योजना कागदावर उतरवली. जूनमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी या योजनेचा समावेश केला. मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर मुख्य सचिवपदावर विराजमान झालेल्या सुजाता सौनिक यांनी या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्वीकारली.

- Advertisement -

महिलांचा आर्थिक स्तर, वयोगट याचा कुठलाही अडसर येऊ न देता अत्यंत काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे निवडणुकीच्या आचारसंहितेची आडकाठी येण्याआधीच महायुतीने महिलांच्या खात्यात दोन ते तीन महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या टाकत दिवाळीच्या सणासुदीत महिलांना बोनस दिला. सत्तेत परतल्यास दरमहा दीड हजार रुपयांचे 2100 रुपये करण्याचे आश्वासनही महायुतीने प्रचार सभांमधून दिले. त्यामुळे सरासरी 2 कोटी लाभार्थी असलेल्या महिलांनी अवघ्या 4 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय गणिते 360 अंशांनी फिरवून महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे.

हेही वाचा – Amol Mitkari : त्यांनी पराभव स्वीकारण्याचे औदार्य दाखवावे; मिटकरींचा शरद पवार गटावर निशाणा


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -