घरमहाराष्ट्रसार्वजनिक जीवनात आई आणि जनता प्रेरणास्थानी

सार्वजनिक जीवनात आई आणि जनता प्रेरणास्थानी

Subscribe

शरद पवार यांनी उलगडे जीवनाचे रहस्य

सार्वजनिक जीवनात वावरत असताना यश-अपयश हे येत असतेच. मात्र या सार्‍यातून उठून उभे राहण्याची ऊर्जा जर मला कोणाकडून मिळाली असेल तर ती माझ्या आईकडून आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून मिळाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या जीवनाचे रहस्य उलगले.

महाराष्ट्रात शरद पवार यांच्या प्रयत्नाने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन होऊन या आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. त्यानंतर गुरुवारी शरद पवारांचा वाढदिवस झाला, त्यामुळे या वाढदिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यावेळी विराजमान झाल्याने पवारांच्या आजच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व होते. शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादीने बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला. यानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या मातोश्रींचाही जन्म झाला म्हणून.१३ डिसेंबर हा माझ्या पत्नीचा वाढदिवस, तसेच याच आसपास माझ्या अनेक जवळच्या मित्रांचा वाढदिवस येतो, त्यामुळे हा दिवस माझ्या नेहमी लक्षात राहतो. माझ्या मातोश्रींनी मोठे कष्ट घेऊन आम्हाला वाढवले. त्या शेती करायच्या, तर वडील नोकरी करायचे. शेतीत जे काही पिकत असे, ते बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाही करायचे. त्या काळातही आमच्या मातोश्रींच्या विचारांची झेप मोठी होती. त्या लोकल बोर्डावर काम करत होत्या. आपल्या समाजाचा विकास कसा करायचा या विचाराने भारावलेल्या होत्या. मुलींच्या शिक्षणासाठीही त्या सदैव आग्रही असत. मातोश्रींच्या पावलावर पाऊल ठेवूनच आज आम्ही सारे कार्य करत आहोत, असे पवार म्हणाले.

आपण ज्या माणसांच्या परिवर्तनासाठी, त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी लढतोय त्यांची शक्ती आपल्याला मिळाली तर कोणतेही संकट आपण पार करू शकतो. आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी, समाजातील तरुण पिढीशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवे, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

बळीराजासाठी ८० लाख
या कार्यक्रमात बळीराजा व आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांसाठी जमवण्यात आलेला ८० लाख रुपयांचा ‘कृषी कृतज्ञता कोष’ राज्यातील शेतकर्‍यांना देण्यासाठी शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ही सर्व रक्कम राष्ट्रवादी वेलफेअर फंडमध्ये जाणार असून हा निधी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांमधील मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार आहे. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बँकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करण्यात येणार आहेत. ही रक्कम वाढेल तशी त्याची व्याप्ती वाढवली जाईल, असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकर्‍यांची मुले सज्ञान व आत्मसन्मानाने कशी उभी राहतील, यासाठी आमचा प्रयत्न राहील, असेही पवार यांनी नमूद केले.

शरद पवारांनी दिल्लीला स्वाभिमान दाखवला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र. दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे छत्रपतींनी दाखवून दिले आणि आता दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे, असे उद्गार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काढले. आकाश गंगेचा तळ सापडत नाही त्याप्रमाणे पवार यांच्या कामाचा तळ सापडत नाही. ८०व्या वर्षात नव्या पिढीला उभे करण्याचे काम फक्त शरद पवार हे करत आहेत.

शून्यातून जग कसे निर्माण करायचे ही किमया पवार यांनी करुन दाखवली. कोणतीही परिस्थिती बदलवू शकतात हाच आदर्श आमच्यासमोर आहे, असेही पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -