घरमहाराष्ट्रराज्यातील 'सेल्फी विथ मेरी माटी' उपक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल, गिनीज बुकात नोंद

राज्यातील ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल, गिनीज बुकात नोंद

Subscribe

मुंबई : केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस हेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा – ओबीसींबाबत भूमिका घेताना वेळकाढूपणा अजिबात नको…, वडेट्टीवारांनी सरकारला खडसावले

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यतामंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्ररस्तोगी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, गिनीज बुक रेकॉर्ड भारतातील प्रतिनिधी ऋषिनाथ अँड्ज्युरिकेटर तसेच सर्व प्राध्यापक आणि एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -

महाराष्ट्राने ‘सेल्फी विथ माटी’ मोहिमेद्वारे 10,42,538 सेल्फींचा सर्वात मोठा सेल्फी अल्बम करण्याचा विश्वविक्रम केला आणि या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या उपक्रमामध्ये 40 विद्यापीठातील 7 हजार महाविद्यालयांतील 25 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अभिनंदन करून 2047पर्यंत देश एक विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी युवकांना केले. तसेच यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचे, ई-बुक प्रकाशनही करण्यात आले.

हेही वाचा – ड्रग्जप्रकरणात वरवरची कारवाई करून चालणार नाही; ललित पाटील प्रकरणी फडणवीसांचे विधान

विक्रमवीरांची परंपरा महाराष्ट्राला आणि इथल्या मातीला लाभली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश अभियान देशभरात राबविण्यात आले. याचाच भाग म्हणून सेल्फी विथ मेरी माटी अभियानाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे ही दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली अभूतपूर्व भेट आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

देशभावनेचे अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सुरुवातीपासून आघाडीवर होता. देशप्रेमाच्या या भावनेतून हा उपक्रम यशस्वी करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला ‘जी 20’चे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला, ही अभिमानाची बाब असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -